नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 844 अहवालापैकी 1 हजार 186 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 515 तर अँटिजेन तपासणीद्वारे 674 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 47 हजार 669 एवढी झाली असून यातील 35 हजार 642 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 10 हजार 891 रुग्ण उपचार घेत असून 165 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर , सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
दिनांक 1 एप्रिल ते 3 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत 27 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 869 एवढी झाली आहे. दिनांक 1 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे कान्केवाडी ता. हदगाव येथील 64 वर्षाची माहिला, काहाला ता. नायगाव येथील 70 वर्षाचा पुरुष, देगलूर नाका नांदेड येथील 45 वर्षाचा पुरुष, बसवेश्वर नगर, नांदेड येथील 38 वर्षाची माहिला, लोहा येथील 75 वर्षाची महिला, सिडको नांदेड येथील 67 वर्षाची महिला, धनेगाव नांदेड येथील 56 वर्षाची महिला, लोहा येथील 60 वर्षाची महिला, खिलवाडी नांदेड येथील 72 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे शिवाजी नगर येथील 63 वर्षाचा पुरुष, सन्मित्र कॉलनी नांदेड येथील 51 वर्षाचा पुरुष, तरोडा खु. येथील 75 वर्षाचा पुरुष , अर्धापूर नांदेड येथील 72 वर्षाची महिला, दिनांक 2 एप्रिल रोजी जयभिम नगर नांदेड येथील 60 वर्षाची महिला, वसंत नगर नायगाव येथील 60 वर्षाची महिला, सांगवी येथील 60 वर्षाची महिला, फरांदे नगर नांदेड येथील 55 वर्षाचा पुरुष, नवी आबादी नांदेड येथील 48 वर्षाचा पुरुष, बांधकाम नगर नांदेड येथील 55 वर्षाची महिला, हिंगाली नाका नांदेड येथील 58 वर्षाचा पुरुष, देगलूर कोविड रुग्णालय येथे इब्राहीमपूर देगलूर येथील 56 वर्षाचा पुरुष, मुखेड कोविड रुग्णालय येथे मुखेड येथील 94 वर्षाचा पुरुष, कुंटूर ता. नायगाव येथील 49 वर्षाचा पुरुष, कंधार कोविड केअर सेंटर समशान भूमी कंधार येथील 65 वर्षाची महिला, खाजगी रुग्णालय येथे रुई कंधार येथील 85 वर्षाचा पुरुष, रविनगर तरोड येथील 79 वर्षाचा पुरुष दिनांक 3 एप्रिल रोजी उमरी कोविड सेंटर येथे रविनगर उमरी 82 वर्षाची महिला असे एकूण 27 रुग्ण उपचारादरम्यान मृत पावले.
आज रोजी 993 बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी 2, मनपा अंतर्गत एन.आर.आय. भवन व गृह विलगीकरण 647, कंधार तालुक्याअंतर्गत 8, किनवट कोविड रुग्णालय 59, बिलोली तालुक्याअंतर्गत 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 28, उमरी तालुक्याअंतर्गत 27, नायगाव तालुक्याअंतर्गत 3, मुखेड कोविड रुग्णालय 31, अर्धापूर तालुक्याअंतर्गत 14, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 10, हदगाव कोविड रुग्णालय 27, माहूर तालुक्याअंतर्गत 9, धमाबाद तालुक्याअंतर्ग 11, खाजगी रुग्णालय 107 असे एकूण 993 बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.76 टक्के आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 242, बिलोली 9, हिमायतनगर 19, मुखेड 29, यवतमाळ 2, नांदेड ग्रामीण 14, देगलूर 15, कंधार 27, नायगाव 24, अर्धापूर 12, धर्माबाद 13, लोहा 45, उमरी 37, भोकर 17, हदगाव 1, माहूर 3, परभणी असे एकूण 512 बाधित आढळले.
आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 310, बिलोली 13, मुदखेड 43, परभणी 4, नांदेड ग्रामीण 30, देगलूर 4,ख् किनवट 68 , मुखेड 28, आदिलाबाद 1, अर्धापूर 30, धर्माबाद 27, लोहा 19, नायगाव 34, भोकर 21, हदगाव 21, माहूर 1, उमरी 8 असे एकूण 674 व्यक्ती अँन्टिजेन तपासणीद्वारे बाधित आले आहेत.
जिल्ह्यात 10 हजार 891 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 241, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 106, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 108, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 134, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 136, मुखेड कोविड रुग्णालय 280, देगलूर कोविड रुग्णालय 50, जैनब हॉस्पीटल कोविड केअर सेंटर देगूलर 113, बिलोली कोविड केअर सेंटर 227, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 13,नायगाव कोविड केअर सेंटर 99, उमरी कोविड केअर सेंटर 32, माहूर कोविड केअर सेंटर 21, भोकर कोविड केअर सेंटर 23, हदगाव कोविड केअर सेंटर 34, हदगाव कोविड केअर सेंटर 67, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 112, कंधार कोविड केअर सेंटर 34, धर्माबाद केअर सेंटर 33, महसूल केअर सेंटर 157, मुदखेड केअर सेंटर 52, अर्धापूर कोविड केअर सेंटर 11, बारड कोविड केअर सेंटर 12, मांडवी केअर सेंटर 6,एन.आर.आय. कोविड केअर सेंटर 275, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 272, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 5 हजार 189 , नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 557, खाजगी रुग्णालय 1 हजार 217 असे 10 हजार 891 रुग्ण उपचार घेत आहेत.
आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 10, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 8 खाटा उपलब्ध आहेत.
*जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.*
एकुण घेतलेले स्वॅब- 3 लाख 34 हजार 260
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 79 हजार 742
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 47 हजार 669
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 35 हजार 642
एकुण मृत्यू संख्या-896
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.76 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-29
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-60
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-381
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-10 हजार 891
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-153.




No comments:
Post a Comment