*जीवन भाष्यावरील संताचे अभंग जेंव्हा कोविड वार्डातील रुग्णांना बळ देवून जातात!* 🎼नांदेड जिल्हा कोविड रुग्णालयातील अभिनव प्रयोग - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, April 4, 2021

*जीवन भाष्यावरील संताचे अभंग जेंव्हा कोविड वार्डातील रुग्णांना बळ देवून जातात!* 🎼नांदेड जिल्हा कोविड रुग्णालयातील अभिनव प्रयोग

 

 


नांदेड (जिमाका) दि. 4 :-  नांदेडच्या जिल्हा रुग्णालयासमोरील तापलेल्या उन्हाची आजची दुपार... रस्त्यावर शासनाच्या आवाहनाप्रमाणे अत्यावश्यक सुरु असलेली वर्दळ....  रुग्णालसमोर असलेल्या गेटच्या बाहेर आपल्या रुग्णांच्या काळजीपोटी उभे असलेले काही नातलग... असे वातावरण केवळ इथेच नाही तर कोणत्याही कोविड सेंटर बाहेर आपल्याला हमखास पहायला आढळेल. 


मागील एक वर्षापासून हॉस्पिटलच्या बाहेरची स्थित्यतंरे बदलत आहेत. मात्र, हॉस्पिटलच्या आतमध्ये उपचारासाठी दाखल असलेले कोविडचे रुग्ण आणि प्राण वाचविण्यासाठी अव्याहतपणे सुरु असलेली डॉक्टरांची धरपड, नर्सेस, ब्रदर्स पासून इतर मेडिकलचा स्टॉफला रोजचे युद्ध आहे. त्यांचे हे युद्ध रुग्णांना कोरोनाच्या तावडीतून बाहेर काढण्यासाठी सुरू आहे. रुग्णालयातील प्रत्येकजण वाटून दिलेल्या जबाबदाऱ्या स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत पार पाडत आहेत. 

रूग्णालयाबाहेर रोज विषय बदलतात मात्र रुग्णालयाच्या चार भिंतीआड कोविड बाधितांच्या आरोग्यासाठी काळजी घेणारी डॉक्टरांचे नियोजन, कामाचा ताण हा तसाच आहे. आत सारेजण आपआपल्या पातळीवर जीवाची परवा न करता झटत आहेत.

 

कोविड बाधितांची संख्या दिवसेंदिवस जशी-जशी झपाट्याने वाढत आहे त्याप्रमाणात हा ताण आरोग्य यंत्रणेवर वाढत आहे, हे नाकारुन चालणार नाही. उपचार करतांना कांही रुग्णांनी दिलेली सकारात्मक साथ हे वास्तविक पाहिलं तर सर्व आरोग्य यंत्रणेला मिळालेली मोठी शक्ती असते, ऊर्जा असते. मात्र आपल्या आजाराला न समजून घेता, आपल्या जबाबदरीला न समजून घेता पेंशटचे नातेवाईक केवळ वैद्यकीय यंत्रणेवर हल्लाबोल करीत असतील तर कुणाच्याच काही हाती पडणार नाही. अशा वृत्तीतून उपचार घेत असलेल्या, नव्याने बाधा झालेल्या पेंशटसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांवरही नकारात्मक परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.

 

वैद्यकीय स्थितीचा सध्याचा आढावा लक्षात घेवून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आत्मिक शांतीसाठी वेगळा विचार करुन कोविड वार्डांमध्ये संगीताच्या माध्यमातून वेगळा प्रयोग करता येतो का, याची चाचपणी केली. रुग्णांसह डॉक्टरांनाही सकारात्मक बळ देता येते का याचा विचार केला. यातूनच कोविड हॉस्पिटलमध्ये जीवन जगण्याची उर्मी देणारे हॉस्पिटल आपल्या व्यवस्थापनातंर्गत का असू नये याचा विचार पुढे आला.


जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यांच्यावर अधिक विचार करुन जिल्ह्यातील कांही निवडक कोविड सेंटरमध्ये म्युझिक अर्थात संगीताच्या माध्यमातून नैराश्याच्या वाटेवर असलेल्या रुग्णांना आध्यात्माच्या माध्यमातून, संगीताच्या माध्यमातून बळ देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. 

"लेकराचे हित। वाहे माऊलीचे चित्त।। एैसी कळवळ्याची जाती। करी लाभेंविण प्रिती।।"

याची प्रचिती आता कोविड उपचारासमवेत बाधित घेत आहेत. या आव्हानात्मक काळात लोकांनी संयम ठेवला पाहिजे. सकारात्मक विचार देण्याची शक्ती महाराष्ट्राच्या लोकधारेत असून अध्यात्माच्या अंगाने संगीताचा माध्यमातून आत्मविश्वास वाढून हस्पिटल मधील वातावरण सकारात्म होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

ही संकल्पना साकारण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नीलकंठ भोसीकर,  अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सिरसिकर यांच्या नेत्रत्त्वाखाली मेडिकलच्या टीम घेत आहे. विशेष म्हणजे काही कोविड सेंटरला सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी दाते पुढे येत आहेत. 

 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News