नांदेड (जिमाका) दि. 5 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 7 अहवालापैकी 906 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 326 तर अँटिजेन तपासणीद्वारे 580 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 48 हजार 575 एवढी झाली असून यातील 35 हजार 642 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 10 हजार 756 रुग्ण उपचार घेत असून 204 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर , सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
दिनांक 2 ते 3 एप्रिल या दोन दिवसांच्या कालावधीत 25 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 921 एवढी झाली आहे. दिनांक 2 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यलय येथे देगलूर तालुक्यातील बल्लूर येथील 60 वर्षाचा पुरुष, आसर्जन नांदेड 76 वर्षाचा पुरुष, सुंदरनगर नांदेड येथील 68 वर्षाची महिला, गुरुद्वारा परिसर नांदेड 45 वर्षाचा पुरुष, हैदरबाग येथील 74 वर्षाचा पुरुष, लोहा येथील 85 वर्षाची महिला, देगलूर नाका नांदेड येथील 71 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे तामसा ता. हदगाव येथील 57 वर्षाचा पुरुष, विकास नगर नांदेड येथील 66 वर्षाचा पुरुष, दिनांक 3 एप्रिल जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे सहयोग नगर नांदेड येथील 82 वर्षाचा पुरुष , विनायक नगर नांदेड येथील 72 वर्षाचा पुरुष, वामन नगर नांदेड येथील 86 वर्षाचा पुरुष, उमरी येथील 63 वर्षाचा पुरुष, हडको नांदेड येथील 67 वर्षाचा पुरुष, फेत्तेबरुज येथील 80 वर्षाची महिला, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे फंरादे पार्क येथील 46 वर्षाची महिला, गणेश टॉकिज परिसर 67 वर्षाची महिला, लोहा येथे वड्डेपुरी येथील 65 वर्षाचा पुरुष, लोहा येथे 60 वर्षाचा पुरुष, सिडको नांदेड येथील 86 वर्षाचा पुरुष, गोदावरी कोविड रुग्णालय अरविंद नगर नांदेड येथील 80 वर्षाचा पुरुष, माहूर तालुक्यातील वडसा येथे 55 वर्षाची महिला, यशोसाई कोविड रुग्णालय सिडको येथे 72 वर्षाची महिला, आश्विनी कोविड रुग्णालय शारदा नगर नांदेड येथील 75 वर्षाचा पुरुष, तिरुमल्ला कोविड रुग्णालय येथे शारदा नगर नांदेड येथील 71 वर्षाची महिला असे एकूण 25 रुग्ण उपचारादरम्यान मृत पावले.
आज रोजी 1 हजार 15 बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी 20, मनपा अंतर्गत एन.आर.आय. भवन व गृह विलगीकरण 663, कंधार तालुक्याअंतर्गत 16, किनवट कोविड रुग्णालय 10, हिमायतनगर तालुक्याअंतर्गत 1, बिलोली तालुक्याअंतर्गत 27, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 18, उमरी तालुक्याअंतर्गत 34, नायगाव तालुक्याअंतर्गत 1, मुखेड कोविड रुग्णालय 16, देगलूर तालुक्याअंतर्गत 6, अर्धापूर तालुक्याअंतर्गत 15, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 14, हदगाव कोविड रुग्णालय 10, माहूर तालुक्याअंतर्गत 6, धर्माबाद तालुक्याअंतर्ग 8, लोहा तालुक्यांतर्गत 30, खाजगी रुग्णालय 120 असे एकूण 1 हजार 15 बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.46 टक्के आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 191, बिलोली 2, हिमायतनगर 12, मुखेड 17, नांदेड ग्रामीण 10, देगलूर 1, कंधार 9, नायगाव 16, अर्धापूर 14, धर्माबाद 4, किनवट 14, यवतमाळ 1, मुदखेड 17, लोहा 17, हिंगोली 1 असे एकूण 326 बाधित आढळले.
आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 343, बिलोली 4, कंधार 11, मुदखेड 16, परभणी 2, नांदेड ग्रामीण 10, देगलूर 25,किनवट 42 , मुखेड 32, यवतमाळ 1, अर्धापूर 7, हिमायतनगर 3, लोहा 26, नायगाव 21, लातूर 1, भोकर 18, हदगाव 11, माहूर 1, उमरी 5, औरंगाबाद 1 असे एकूण 580 व्यक्ती अँन्टिजेन तपासणीद्वारे बाधित आले आहेत.
जिल्ह्यात 10 हजार 756 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 241, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 106, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 196, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 140, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 144, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 331, देगलूर कोविड रुग्णालय 50, नायगाव कोविड केअर सेंटर 97, उमरी कोविड केअर सेंटर 29, माहूर कोविड केअर सेंटर 23, भोकर कोविड केअर सेंटर 16, हदगाव कोविड रुग्णालय 44, हदगाव कोविड केअर सेंटर 67, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 127, अर्धापूर कोविड केअर सेंटर18, बारड कोविड केअर सेंटर 12, मांडवी कोविड केअर सेंटर 8, महसूल कोविड केअर सेंटर 163, एनआरआय कोविड केअर सेंटर 272, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 297, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 4 हजार 709, जैनब हॉस्पीटल कोविड केअर सेंटर देगूलर 89,बिलोली कोविड केअर सेंटर 226, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 11,कंधार कोविड केअर सेंटर 99,धर्माबाद कोविड केअर सेंटर 74, मुदखेड कोविड केअर सेंटर 11, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 897 , खाजगी रुग्णालय 1 हजार 339 असे एकूण 10 हजार 756 रुग्ण उपचार घेत आहेत.
आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 9, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 7, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 6 खाटा उपलब्ध आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 3 लाख 39 हजार 144
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 83 हजार 672
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 48 हजार 575
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 36 हजार 657
एकुण मृत्यू संख्या-921
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.46 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-14
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-64
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-376
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-10 हजार 756
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-204.




No comments:
Post a Comment