राज ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना फोन ; एमपीएससी परीक्षापुढे ढकलण्याची विनंती - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, April 9, 2021

राज ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना फोन ; एमपीएससी परीक्षापुढे ढकलण्याची विनंती



मुंबई ( सुषेण नरे ) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी दूरध्वनी संपर्क साधला. राज्यात एमपीएससीच्या परीक्षा होणार आहेत. या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांना आपलं घर सोडून दूर अशा ठिकाणी परीक्षा केंद्रावर जावे लागणार आहे, आणि अशावेळी कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. या रोगाचा प्रादुर्भाव व वाढता धोका लक्षात घेता या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी विनंती राज साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. 

       दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे लसीची कमतरता. राज्य व केंद्र सरकारचा संघर्ष दिसून येत आहे. मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी कोरोनाच्या काळात आपल्याला सहकार्य करावे विरोधासाठी विरोध न करता राज्य चालविण्यासाठी मदत करावी म्हणून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस आणि राज ठाकरे यांच्याशी नुकताच दूरध्वनीवर संपर्क साधला होता. आणि या वेळी या दोन्ही नेत्यांनी आपण राज्य सरकारला यावेळी सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले होते राज्यातील कोरोनाची संख्या वाढत आहे त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात तसेच दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी नुकतीच राजसाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे केली होती याला आता कसा प्रतिसाद मिळतो ते लवकर कळेच.

          डॉक्टर उमा पंचाल यांच्या मते राज्यातील कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लवकरात लवकर जास्तीचा लस पुरवठा करण्यासाठी राज्यातील नेत्यांनी केंद्र सरकारशी संपर्क साधावा असे मत व्यक्त केले आहे. विजय महाजन या शिक्षकांनी सर्व शिक्षकांचे लशीकरण करावे व त्यानंतरच परीक्षा कामासाठी शिक्षकांना नियुक्त करावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. प्रकाश शेट्टी यांच्या मते लाँकडाऊनच्या काळात कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेणे धोकादायक ठरेल अशी भीती व्यक्त केली आहे. तर स्वप्ना ढेरे यांनी राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून ब्रेक दी चेन या सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News