मुंबई ( सुषेण नरे ) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून राज्यात होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या, अशी विनंती केली होती. याची तात्काळ दखल घेऊन एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
11 एप्रिल 2021 रोजी होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी फोन वरून संपर्क साधला होता. आज या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षेची पुढील तारीख लवकर च जाहीर करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले आहे. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा केव्हा होणार? हा प्रश्न विद्यार्थी पालक व शिक्षकांच्या मनात आहे.
परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांना आपलं घर सोडून दूर अशा ठिकाणी परीक्षा केंद्रावर जावे लागणार आहे आणि अशावेळी कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. या रोगाचा प्रादुर्भाव व वाढता धोका लक्षात घेता या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी विनंती राज साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही वेळेपूर्वी केली होती.
दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे लसीची कमतरता. राज्य व केंद्र सरकारचा संघर्ष दिसून येत आहे. मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी कोरोनाच्या काळात आपल्याला सहकार्य करावे विरोधासाठी विरोध न करता राज्य चालविण्यासाठी मदत करावी म्हणून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस आणि राज ठाकरे यांच्याशी नुकताच दूरध्वनीवर संपर्क साधला होता. या वेळी या दोन्ही नेत्यांनी आपण राज्य सरकारला यावेळी सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले होते. राज्यातील कोरोनाची संख्या वाढत आहे त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात तसेच दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी नुकतीच राजसाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे केली होती. याला आता प्रतिसाद मिळल्याचे परीक्षा पुढे ढकलल्याच्या निर्णयाद्वारे दिसून आले आहे.
डॉ. उमा पंचाल यांच्या मते राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर जास्तीचा लस पुरवठा करण्यासाठी राज्यातील नेत्यांनी केंद्र सरकारशी संपर्क साधावा असे मत व्यक्त केले आहे. विजय महाजन या शिक्षकांनी सर्व शिक्षकांचे लसीकरण करावे व त्यानंतरच परीक्षा कामासाठी शिक्षकांना नियुक्त करावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. प्रकाश शेट्टी यांच्या मते लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेणे धोकादायक ठरेल अशी भीती व्यक्त केली आहे. तर स्वप्ना ढेरे यांनी राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून ब्रेक दी चेन या सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.




No comments:
Post a Comment