*मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देगलूरचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांना श्रद्धांजली* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, April 10, 2021

*मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देगलूरचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांना श्रद्धांजली*

 







मुंंबई : आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे सर्वसामान्यांच्या सुखदुःखात समरस होणारा सच्चा लोकप्रतिनिधी हरपला आहे. देगलूर-बिलोलीसह नांदेड जिल्ह्यातील विकासासाठी झटणारे, लोकहिताच्या विषयात प्रसंगी संघर्ष करणारे अंतापूरकर सदैव आठवणीत राहतील. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना. आमदार रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

*-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*



*आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने विधिमंडळातील अभ्यासू सहकारी गमावला*

- उपमुख्यमंत्री अजित पवार


 “देगलुरचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने राज्याच्या विधीमंडळातील अभ्यासू लोकप्रतिनिधी, मराठवाड्यातील लोकप्रिय, संघर्षशील नेतृत्वं, सर्वसामान्यांशी नाळ जोडलेला निकटचा सहकारी आज आपण गमावला आहे. त्यांच्या निधनानं देगलूर तालुका आणि महाविकास आघाडीची मोठी हानी झाली आहे. अंतापूरकर कुटुंबिय आणि देगलूरवासियांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. दिवंगत रावसाहेब अंतापूरकर साहेबांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News