आदिवासींच्या लोकजीवनांचा विवेचनात्मक ग्रंथ.. 'आदिवासी साहित्य : जाणीव जागर' -पुस्तक परिचय : रमेश मुनेश्वर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, April 10, 2021

आदिवासींच्या लोकजीवनांचा विवेचनात्मक ग्रंथ.. 'आदिवासी साहित्य : जाणीव जागर' -पुस्तक परिचय : रमेश मुनेश्वर

 





आदिवासींच्या लोकजीवनांचा विवेचनात्मक ग्रंथ.. 'आदिवासी साहित्य : जाणीव जागर'

-पुस्तक परिचय : रमेश मुनेश्वर

________________________________



          महाराष्ट्रातील आदिवासी समाज हा निसर्ग सान्निध्यात राहत असताना त्यांची संस्कृती लोकजीवन भाषा लोकगीते वाद्य देव-देवता सण-उत्सव यांना त्यांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आदिवासी लोक गीतांचा अविष्कार त्यांच्या मुखी परंपरेतून मिळतो. महाराष्ट्रातील विविध भागात असणाऱ्या विविध संशोधकांनी आपले संशोधन लेख उपलब्ध करून दिले त्यावरूनच प्रा. डॉ. पंजाब शेरे आणि प्रा. डॉ. राजू मोतेराव यांनी हा ग्रंथ संपादित करून वाचकांना उपलब्ध करून दिला आहे.


आदिवासी समाज अजूनही सर्वांगीण विकासापासून वंचित असला तरी सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत प्रगत आहे. त्यांनी आपली संस्कृती आजही टिकवून ठेवली आहे. देश एकीकडे महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे तर आदिवासी समाज आजही आपल्या मूलभूत न्याय हक्कापासून दूर आहे. आदिवासी संस्कृती ही वैशिष्ट्यपूर्ण असून त्यांनी आपल्या संस्कृतीचे योग्य प्रकारे जतन केले आहे. आदिवासी या शब्दाभोवती अद्यापही एक कुतूहलाचे जिज्ञासेचे वलय आहे. या वलयात वेगवेगळ्या रंगाचे काही आहे. लोकनृत्य, लोकसंगीत त्यामुळे त्यांचे लोकसाहित्य मनोरंजनाचे हुकमी ठरते.


आदिवासी साहित्य जाणीव जागर या संपादित ग्रंथातून आदिवासी जमातीतील गोंड, कोलाम ,पावरा, कोरकू यांची ओळख आदिवासींची बोलीभाषा, आदिवासी धर्म, लोककथा, प्राचीन काळातील गोंडी लिपी, लोकसाहित्य ललित, कला, गोठूल, आदिवासींची संस्कृती, प्रथा- परंपरा, लोकसंस्कृती, सामाजिक आर्थिक व सांस्कृतिक जीवन राजकीय व्यवस्था. घटस्फोट, लोकजीवन, लोकगीते व कविता या विविध अंगाने आदिवासी जीवन संस्कृती आणि लोकसाहित्य प्रस्तुत करण्याचा प्रयत्न या पुस्तकात लेखकांनी केलेला आहे. आदिवासी भागात राहात असताना त्यांचे जीवन जवळून पाहण्याचा अनुभव त्याच प्रेरणेने पुस्तक संपादित करण्याचा विचार लेखकांना संपादकांना आला आहे. यासाठी अनेक आदिवासी साहित्यिक, विचारवंत, समाजसेवक, शिक्षक आणि अनेक विद्यापीठातील आदिवासी अभ्यासकांचे लेख या पुस्तकात समाविष्ट आहेत.


या पुस्तकात वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या साहित्यिकांनी लेख लिहिलेले आहेत. त्यामध्ये भारतीय आदिवासी संस्कृती व त्यांची परंपरा (शेषेराव मडावी), आदिवासी बोली लोक साहित्य आणि दलित साहित्य अनुबंध (बाबाराव मडावी), आदिवासींची राजकीय व्यवस्था ( डॉ.रत्ना कोमावर), कोलामी लोकगीतांमधून व्यक्त होणारे विविध भाव-भावना (प्रा. डॉ. राजू मोतेराव), किनवट तालुक्यातील आदिवासी एक दृष्टिक्षेप (प्रा. डॉ. शुभांगी दिवे), नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींचे जीवन आर्थिक व सामाजिक समस्या आणि उपाय (प्रा. ए.के. जगताप), कोरकू आदिवासी लोकजीवन आणि संस्कृती (प्रा. लक्ष्मण वाघमारे), आदिवासी आणि धर्म (प्रा. स्वाती कुरमे), आदिवासी लोकगीतातील स्त्रीधन (प्रा.डॉ.पंजाब शेरे), आदिवासींच्या बोली महाराष्ट्राच्या संदर्भात (प्रा. वाय. एच. महाले) आदिवासी कवितेतील वेदना व विद्रोह (प्रा. अनिल काळबांडे), आदिवासी साहित्य जाणीव जागर आदिवासी अर्थव्यवस्था (प्रा. आर्थिक पाटील), नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी पावरा समाजाचे सांस्कृतिक जीवन (प्रा. डॉ. सुरेखा बनकर), आदिवासी लोकगीतातील रूढी परंपरा (प्रा. डॉ. राजेश धनजकर) आदिवासी समुदाय धर्म आणि जात (प्रा. डॉ. माधव बसवंते), आदिवासी कवितेतील मातृ प्रतिमा (प्रा. संदीप खंडाते), आदिवासी धर्म स्वरूप आणि चिकित्सा (विनायक येवले ), आदिवासी लोकसंस्कृती (प्रा. प्रकाश कोथळे ), आदिवासी जमाती आणि परंपरा (प्रा.डॉ.प्रज्ञा घोडवाडीकर), गोंडाचे सांस्कृतिक जीवन एच. एल. सोनकांबळे (डॉ. श्यामल देशमुख), आदिवासी बोली भाषा (प्रा. सुलतान पवार), आदिवासींची घोटुल प्रथा एक सांस्कृतिक आदर्श (प्रा. डॉ. सूर्यप्रकाश जाधव), आदिवासी जमाती मधील घटस्फोट पद्धती (साईनाथ भोकरे व सुदर्शन शेळके), आदिवासी समाजातील स्त्रियांचा दर्जा एक सामाजिक अभ्यास (प्रा. सुलोचना जाधव), आदिवासींचे आर्थिक व सामाजिक जीवन (प्रा. एच. एस. मोहोकार), प्राचीन काळातील गोंडी लिपी एक शोध (सिताराम मंडाले), नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी जमातींचा शाश्वत विकास (प्रा.डॉ. शामराव वायसे).


भारतामध्ये अनेक आदिवासी जमाती अस्तित्वात आहेत. महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात आदिवासी जमातीच्या संख्येचा विचार केला तर महाराष्ट्र शासनाने जवळपास 47 जमातींना अनुसूचित जमातीचा दर्जा दिलेला आहे. वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशात विखुरलेल्या या जमातीतील लोकांचा व्यवहार त्यात या जमातींच्या बोलीभाषेतून चालतो. मुळातच शिक्षणापासून आणि औद्योगिकीकरण यापासून शेकडो मैल दूर डोंगरदर्‍यात वास्तव्य करून राहणाऱ्या आदिवासींनी आपल्या बोलीभाषेत आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. बहुतेक आदिवासी समूहाच्या अशिक्षित पणामुळे प्रमाण भाषेचे त्यांचा फारसा संपर्क येत नाही. त्यामुळे लहानपणापासूनच आपल्या बोलींचा संस्कार त्यांच्यावर अधिक होतो. त्यामुळे सहाजिकच बोलीचा वापर ते अधिक करताना दिसतात.


महाराष्ट्रातील आदिवासी जमातीच्या लहान-मोठ्या 74 बोलीभाषा आहेत. आदिवासी मधील गोंड, कोरकू, कोलाम, भिल्ल, पावरा, माडिया या जमातीच्या बोलीभाषा मराठीला थोड्या दूरच्या आहेत बाकी वारली, कातकरी, ठाकर, मल्हार, कोळी यांच्या ही भाषा मराठी सारख्याच आहेत. तरीदेखील आदिवासी मुलांना अडचणी येतात विचार देवाणघेवाण करण्याच्या प्राथमिक पातळीवरील आदिवासी मुलांची ही अडचण आदिवासींमध्ये कमतरतेची भावना निर्माण करते. खऱ्या अर्थाने आदिवासी साहित्याचे महिना, स्तोत्र मुळी त्यांची संस्कृती आणि बोलीभाषा आहे. तेव्हा वेगळी सांस्कृतिक वैशिष्ट्ये घेऊन आदिवासींच्या बोली भाषेत पकडलेले लोकवांगमय आणि लिहिले गेलेले साहित्य हे खऱ्या अर्थाने आदिवासी साहित्य असेल तेच खरे वास्तववादी साहित्य ठरेल.


आदिवासी हे भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. आदिवासीं जगाच्या बहुतेक भागांमध्ये सापडतात. विविध देशांमध्ये त्यांना वेगळ्या नावाने ओळखले जाते. आदिवासी म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण जीवनपद्धती. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केला तरीदेखील आदिवासी विकासाच्या प्रवाहात येऊ शकले नाही. आजही त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अनेक योजना राबविल्या तरी त्यांच्या समस्यांची तीव्रता कमी झालेल्या नाही. दारिद्र्य, बेरोजगारी, स्थलांतर, कुपोषण, बालमृत्यू, पिळवणूक, कर्जबाजारीपणा, व्यसनाधीनता इत्यादी समस्यांनी आदिवासी जमाती त्रस्त झाले आहे. या सर्व समस्यांवर सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. अनेक जिल्ह्यात आरोग्यविषयक सुविधा आणि राज्य सरकारच्या रोजगार योजना आदिवासी विकास योजना साक्षरता याविषयी आदिवासी जमातींमध्ये जाणीवजागृती निर्माण करून आदिवासी जमातींना विकासाच्या प्रवाहात सामावून घेणे आवश्यक आहे.


आदिवासींच्या जीवनामध्ये वृक्षांना आगळेवेगळे स्थान आहे. त्यात आंब्याचा वृक्ष, पिंपळाचे वृक्ष, साल वृक्ष , इत्यादी त्यांच्या जीवनामध्ये त्यास आगळेवेगळे स्थान असून साल वृक्ष हे लोकांचे सामाजिक व धार्मिक दृष्ट्या एक प्रकारची लक्षणे चिन्हे इतकेच नव्हे तर साल वृक्ष गोंड लोकात एवढे पूजनीय आहे. त्याचे ते आपले कुलदैवत म्हणून पूजा करतात साल वृक्ष काही गोत्राचे कुलदैवत असून कुलचिन्ह आहे.


कला, संगीत, नृत्य आणि लोकसाहित्य अकादमीच्या माध्यमातून आदिवासींनी आपल्या सांस्कृतिक परंपरेचे जतन केले आहे. आदिवासींची कला, संगीत, नृत्य व मौखिक साहित्य टाकावू नाही. आदिवासींची कला, नृत्य, मौखिक साहित्य मनाला प्रेरित करणारे आनंददायी उल्हास निर्माण करणारी आहे. गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड जिल्ह्यातील लोक नृत्य करतात. हे नृत्य चालू असताना आनंद, उल्हास नृत्य करण्याची प्रेरणा देते. कला त्यांनी आपल्या घरावर काढलेली चित्रे, वारली चित्रकला माणसाला अचंबित करणारे आहे. आदिवासींची गाणी आजही मनाला प्रसन्न करतात म्हणून ही संस्कृती लोकसंस्कृती आहे ती जतन व्हायला पाहिजे ते नष्ट होऊ नये. आजही आपल्या आदिवासींच्या लोकसंस्कृतीचे माहिती करून घेण्यासाठी त्याचा विचार करावा लागतो.


लोकसंस्कृती आदर्श आचार संस्था म्हणून मान्यता पावले आहे. खऱ्या अर्थाने आदिवासी हा येथील मूळ निवासी. आदिवासी जंगलात राहून आपली कला संस्कृती आपले वेगळे विश्व असल्याने त्याचे जतन केले आहे. या जमातीचा इतिहास व संस्कृती विज्ञान पिढ्या मोठे परंपरेने जतन केल्या. आजच्या आपल्या जीवनशैलीचे पाळेमुळे आदिवासी लोकसंस्कृतीत आहे. आदिवासी संस्कृतीत स्त्रीला प्रतिष्ठा व स्वातंत्र प्राप्त झाले आहे.


' आदिवासी साहित्य : जाणीव जागर ' प्रा.डॉ. पंजाब लक्ष्मणराव शेरे, बळीराम पाटील महाविद्यालय किनवट जिल्हा नांदेड आणि प्रा.डॉ. राजू श्रावण मोतेराव, सरस्वती अध्यापक महाविद्यालय किनवट जिल्हा नांदेड येथे कार्यरत असून हे पुस्तक संपादित करून आदिवासी समाजांचा इतिहास अभ्यासकांना उपलब्ध करून दिला आहे.

अल्फा पब्लिकेशन नांदेडने हे पुस्तक प्रकाशित केल आहे. मुखपृष्ठ संकल्पना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे शेख शहाबुद्दीन यांची आहे. मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ आकर्षक आहे. पुस्तकाचे बांधणी मजबूत असून या पुस्तकात १६८ पानं असून २७ लेख आहेत. आदिवासींच्या अभ्यास करण्यासाठी हे पुस्तक संदर्भ म्हणून नक्कीच अभ्यासकाना आवडेल यात शंका नाही.


______________________________


पुस्तक परिचय : रमेश मुनेश्वर

स्तंभलेखक, किनवट जि. नांदेड 

संवाद - ७५८८४२४७३५

( लेखक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत. )

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News