कोविड केअर सेंटर मध्ये रेमिडीसीव्हर इंजेक्शन; पुरेसा ऑक्सीजन साठा उपलब्ध करा... -आमदार भीमराव केराम यांची जिल्हाधिकार्‍यांना मागणी! - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, April 10, 2021

कोविड केअर सेंटर मध्ये रेमिडीसीव्हर इंजेक्शन; पुरेसा ऑक्सीजन साठा उपलब्ध करा... -आमदार भीमराव केराम यांची जिल्हाधिकार्‍यांना मागणी!

 




किनवट : कोरोना आजाराच्या प्रादुर्भावात दुर्गम डोंगराळ आदिवासी, बंजारा बहुल माहूर आणि किनवट तालुक्यातील  कोविड केअर सेंटर मध्ये अत्यावश्यक रेमीडीसीव्हर इंजेक्शन तसेच पुरेसा ऑक्सीजन साठा उपलब्ध करून देण्याची विनंती आमदार भीमराव केराम यांनी दिनांक 9 रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांना एका पत्राद्वारे केली आहे.


नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येचा उद्रेक काही केल्या थांबत नाहीये. आरोग्य विभाग अहोरात्र कोरोना तपासण्या, लसीकरण आदि कामांमध्ये व्यग्र आहे. परंतु अत्यावश्यक मेडिसिन्स व अपुऱ्या मनुष्यबळामुळे सर्वच घटकाला चांगल्या दर्जाचे उपचार देणे कठीण बनत चालले आहे. अशा परिस्थितीत किनवट व माहूर या आदिवासी विभागासाठी अत्यावश्यक रेमीडीसीव्हर इंजेक्शन तसेच पुरेशा प्रमाणात ऑक्सीजन साठा उपलब्ध करून देण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत किनवट माहूर या आदिवासी विभागातील शहरासहित खेडे गावात असंख्य कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना संशयित रुग्ण किनवट येथील डीसीसीएच व सीसीसी मध्ये तसेच एका खाजगी कोविड सेंटर मध्ये उपचार घेत असून अत्यवस्थ प्रकृती असलेल्या रूग्णांसाठी किनवट येथे कुठलेही उपचार सामग्री उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे. वाढती रुग्ण संख्या व त्याची तीव्रता लक्षात घेता आदिवासी विभागातील रुग्णांच्या स्वस्थ्यासाठी अत्यावश्यक रेमीडीसीव्हर इंजेक्शन तसेच पुरेसा ऑक्सीजन साठा उपलब्ध होण्यासाठी किनवट येथे अत्यावश्यक रेमीडीसीव्हर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याबाबत सहाय्यक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन नांदेड यांना तातडीने आदेशित करून सहकार्य करण्याची विनंती आमदार भीमराव केराम यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना केली आहे. 

       तसेच  किनवट आणि माहूर तालुक्यातील नागरिकांनी कोरोना लसीकरण मोहिमेला प्रतिसाद देऊन कोविड लसीकरणाचा डोस घ्यावे कारण कोविडची लस पूर्णतः सुरक्षित असून कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता पूर्ण लसीकरण करून घेण्याचे आवाहनही आमदार भीमराव केराम यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News