*कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया प्रांताकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अनोखा सन्मान* *आंबेडकर जयंती 'समता दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय* *_ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ब्रिटीश कोलंबियाच्या अधिकाऱ्यांचे मानले आभार_* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, April 13, 2021

*कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया प्रांताकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अनोखा सन्मान* *आंबेडकर जयंती 'समता दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय* *_ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ब्रिटीश कोलंबियाच्या अधिकाऱ्यांचे मानले आभार_*

 



 


मुंबई, दि. 13: कॅनडा देशातील ब्रिटिश कोलंबिया प्रांताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिन 'समता दिन' म्हणून साजरा करण्याचा घेतलेला निर्णय मानवतेला डॉ. आंबेडकरांच्या मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाच्या आदर्शांनुसार वाटचाल करण्याची प्रेरणा देईल, अशा शब्दात भावना व्यक्त करत राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ब्रिटीश कोलंबियाचे लेफ्टनंट राज्यपाल यांचे पत्राद्वारे आभार मानले आहे.


 सामाजिक न्याय आणि समानतेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान लक्षात घेऊन कॅनडामधील ब्रिटीश कोलंबिया प्रांताने दि. 14 एप्रिल रोजी आपल्या प्रांतात 'समानता दिन' साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.


डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा ब्रिटिश कोलंबियाच्या प्रशासनाने गौरव केल्याचा आनंद व्यक्त करत डॉ. राऊत पुढे म्हणाले की, जगभरातील लोक आपल्या सामाजिक आणि वांशिक भेदभावाविरूद्धच्या लढाईत डॉ. आंबेडकर यांच्या विचार आणि कार्यातून प्रेरणा घेत आहेत. ब्रिटीश कोलंबियाच्या प्रशासनाची आपल्या प्रदेशात सामाजिक न्यायासाठी आणि वांशिक भेदभावाविरुद्ध लढा देण्याची प्रतिबद्धता प्रशंसनीय आहे.


डॉ. आंबेडकर यांचे भारत तसेच सर्व जगभरातील अनुयायांना आंबेडकरांचा वारसा जगभरातील मानवतेशी सामायिक करताना अभिमान आणि आनंद वाटतो. डॉ. आंबेडकर यांनी सामाजिक न्याय आणि समानतेसाठी अखेरच्या श्वासापर्यंत अविरत संघर्ष केला, असेही डॉ. राऊत आपल्या पत्रात म्हणतात.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News