नांदेड (जिमाका) दि. १३ :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या एकूण ६१५० अहवालापैकी १ हजार ६६४ कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ७०१ तर अँटिजेन तपासणीद्वारे ९६३ अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ६१ हजार ७२ एवढी झाली असून यातील ४६ हजार ५७८ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला १३ हजार १०७ रुग्ण उपचार घेत असून २०४ बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
दिनांक ९ ते १२ एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीत २७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या १ हजार १३० एवढी झाली आहे. आज दिनांक ९ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे सहयोग नगर नांदेड येथील ७० वर्षांचा पुरुष, १० एप्रिल रोजी बजाज कॉंप्लेक्स नांदेड येथील ५४ वर्षांची महिला, तरोडा नाका नांदेड येथील ७० वर्षांचा पुरुष, सावरगाव ता. हदगाव येथील ५५ वर्षांचा पुरुष, जैन मंदिर नांदेड येथील ८५ वर्षांचा पुरुष, यश नगर नांदेड येथील ७३ वर्षांचा पुरुष, महेबूब नगर नांदेड येथील ४५ वर्षांचा पुरुष, वडगाव ता. लोहा येथील ६० वर्षांचा पुरुष, आशा कोविड रुग्णालय येथे देगावचाळ नांदेड येथील ७० वर्षीय महिला, ११ एप्रिल रोजी हदगाव कोविड रुग्णालय येथे लिंगापुरा ता. हदगाव येथील ४३ वर्षांचा पुरुष, १२ एप्रिल रोजी हदगाव कोविड रुग्णालय खडकी ता. हिमायतनगर येथील ६५ वर्षांचा पुरुष, तळेगाव ता. हदगाव येथील ५५ वर्षांची महिला, सप्ति ता. हदगाव येथील ५५ वर्षांचा पुरुष, फोनीक्स कोविड रुग्णालय वसंतवाडी ता. कंधार येथे ३० वर्षांचा पुरुष, आशा कोविड रुग्णालय येथे भावसार चौक नांदेड येथील ५४ वर्षांचा पुरुष, नांदेड येथील ७५ वर्षांची महिला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे कंधार येथील ७० वर्षांचा पुरुष, बिलोली येथील ६८ वर्षांचा पुरुष, उमरी येथील ६२ वर्षांचा पुरुष, वामन नगर नांदेड येथील ५४ वर्षांचा पुरुष, बामणी ता. अर्धापूर येथील ५५ वर्षांची महिला, अंबाजी नगर ता. अर्धापूर येथील ४७ वर्षांचा पुरुष, लोहा येथील ८५ वर्षांचा पुरुष, अर्धापूर येथील ६६ वर्षांची महिला, तरोडा , नांदेड येथील ७९ वर्षांचा पुरुष, अपेक्षा कोविड रुग्णालय येथे नाटकर गल्ली देगलूर येथील ७२ वर्षांचा पुरुष, १३ एप्रिल रोजी भगवती कोविड रुग्णालय येथे महावीर चौक नांदेड येथील ५५ वर्षांची महिला यांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.२६ टक्के आहे.
आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 2, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 10 खाटा उपलब्ध आहेत.
*जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.*
एकुण घेतलेले स्वॅब- ३ लाख ८६ हजार ७५६
एकुण निगेटिव्ह स्वॅब- ३ लाख १८ हजार १३४
आजवर एकुण बाधित व्यक्ती- ६१ हजार ७२
आजवर बरे झाले एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- ४६ हजार ५७८
एकुण मृत्यू संख्या- १ हजार १३०
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.२६ टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- १७
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- ३७
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- ३७८
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- १३ हजार १०७
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले- २०४.




No comments:
Post a Comment