पूल व रस्ते बांधकामासाठी गुत्तेदारांनी लावला चुरीचा सपाटा - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, April 16, 2021

पूल व रस्ते बांधकामासाठी गुत्तेदारांनी लावला चुरीचा सपाटा

 






भोकर (डॉ. कैलास कानिंदे )  : नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी “ विकास ” या संकल्पनेच्या माध्यमातून तालुक्यासाठी भरपूर प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्या माध्यमातून पूल व रस्ते बांधकाम जोरात सुरु आहेत. बांधकामासाठी पूर्वी रेतीचा वापर होत होता. त्यामुळे त्या बांधकामाचे आयुष्य जास्त किंवा टिकाऊ होते. परंतु सद्यस्थितीमध्ये रेती ऐवजी चुरीचा वापर फार मोठ्या प्रमाणात केला जात आहे.ज्याप्रमाणे पूर्वीच्या माणसांचे आयुष्य दीर्घयुष्य होते. पण सध्या हे आयुष्य घटत चालले आहे. त्याचप्रमाणे बांधकामाचे सुद्धा आयुष्य घटते कि काय ? अशी शंका-कुशंका जनमानसात निर्माण होत आहे. त्यासाठी कोणती कारणे, कोणती यंत्रणा जबाबदार आहे ? याचा विचार करण्याची गरज आहे. 

        प्राचीन काळात पूल बांधकामासाठी निसर्गात उपलब्ध असणारी सामुग्री म्हणजे लाकूड व दगड यांचा उपयोग केला जात असे. वीट भट्ट्यांच्या शोधानंतर लाकूड व दगड याऐवजी विटांचे पूल बांधले जाऊ लागले. 1906 मध्ये पोर्टलंड सिमेंटमध्ये लोखंडाच्या नळ्याचा अंतर्भाव करून प्रलंबित सिमेंटचा पहिला पूल स्वित्झर्लंड मधील तवानास येथे –हाईन नदीवर बांधला गेला. इंग्लंडमध्ये पहिला लोहमार्ग 1825 मध्ये सुरु झाला. त्यानंतर अमेरिकेत लोहमार्गाचा विकास होऊ लागला. त्यासाठी मार्गातील बहुसंख्य ठिकाणी नदी व दरी ओलांडण्यासाठी अनेक कैची पूल बांधले गेले. इंग्लंड व अमेरिका या देशात लोहमार्गाचा विकास झपाट्याने होऊ लागल्याने पूल बांधण्याच्या संख्येत हि वाढ झाली. परंतु त्याकाळी चलभार व वेगाने जाणाऱ्या चलभाराचा आघाती परिणाम या बद्दल फारसे ज्ञान नव्हते.   अपुऱ्या ज्ञानाच्या आधारे बांधलेले अनेक घडीव लोखंडी पूल एकोनिसाव्या शतका अखेर कोसळण्याचे प्रकार घडले.


       20 व्या शतकाच्या सुरुवातीला पूर्व प्रतिबलीत कॉक्रीटचा उदय झाला. तसेच उच्च बलाची पोलाद निर्मिती 20 व्या शतकाच्या मध्यास झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर आलेल्या मंदीमुळे कुशल-अकुशल कामगार स्वस्तात मिळू लागले. हळूहळू बांधकामाची गती वाढू लागली. त्याचप्रमाणात सिमेंट, पोलाद, रेती यांच्यातील दर्जात हि स्पर्धा वेगाने वाढत गेली. अभिक्ल्पासाठी निविदा Tender काढून कंत्राटदार बांधकाम खर्चाचा अंदाज Estimate मांडून कमी खर्चाचा प्रकल्प निवडतात.

        सध्या पुलासाठी वापरात येणाऱ्या प्रलंबित कॉंक्रीटचे बल 40 MPa किंवा 5800 Psi असते. तर पूर्व प्रतिबलित कॉंक्रिटचे बल 70 MPa किंवा 10,000 Psi, भविष्यात हे बल 100 MPa किंवा 15,000 Psi पर्यंत जाऊ शकेल, असा अंदाज आहे. तसेच पोलाद साधारणपणे 250 MPa किंवा 36,000 Psi शरण बिंदूचे असते. मात्र भविष्यात पोलादाचा शरण बिंदू 550 MPa किंवा 80,000 Psi पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

      बांधकामासाठी दिवसेंदिवस त्यात सुधारणा होऊन मजबूतीचे काम व्हायला पाहिजे. परंतु कंत्राटदार कमी खर्चात काम पूर्ण करून जास्तीत जास्त रक्कम नफा आपल्याला कसा मिळेल. याकडेच त्यांचे लक्ष असते. सध्या रेतीचे भाव वाढले असल्यामुळे कंत्राटदार कामचलाऊ चुरीमध्ये बांधकाम करत आहेत. परंतु त्या बांधकामाच्या मजबूतीचे , आयुष्याचे काय ? यावर शासन स्तरावर कुठेतरी चर्चा, विचार विनिमय होण्याची गरज आहे.


 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News