किनवट : मतदार संघातील माहूर येथील ग्रामीण रुग्णालय व गोकुंदा येथील उप जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम व विस्तारीकरणासाठी सततचा पाठपुरावा केल्याने जिल्हा वार्षिक योजनेतून कामे मंजूर करून तीन कोटी सतरा लक्ष आठ हजार निधी उपलब्ध केल्याबद्दल पालकंत्री व प्रशासनाचे आमदार भीमराव केराम यांनी आभार मानले आहेत.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण ) सन 2020-21 अंतर्गत राज्य शासनाने योजनानिहाय मंजूर केलेल्या व नियतव्यय व अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार कामे प्रस्तावित करता येतात. सध्याची कोरोना संसर्गाची स्थिती पाहता. आमदार भीमराव केराम यांनी किनवट मतदार संघातील माहूर येथील ग्रामीण रुग्णालय व गोकुंदा (ता किनवट ) येथील उप जिल्हा रुग्णालयाच्या बांधकाम व विस्तारीकरण करणेसाठीची कामे पालकमंत्री अशोक चव्हाण व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचेकडे प्रस्तावित केली होती. याचा सतत पाठपुरावा केल्याने त्यांनी पुढील कामे मंजूर करून निधी उपलब्ध करून दिला आहे. (कंसात प्रशासकीय मान्यता रक्कम )
*ग्रामीण रुगणालयाचे बांधकाम व विस्तारीकरण करणे* : या अंतर्गत ग्रामीण रुग्णालय माहूरची मुख्य इमारत व परिसराची दुरुस्ती ( 92.16 लक्ष )
*उप जिल्हा रुगणालयाचे बांधकाम व विस्तारीकरण करणे* : या अंतर्गत उप जिल्हा रुग्णालय गोकुंदा दुरुस्ती करणे (35.03 लक्ष), उप जिल्हा रुग्णालय गोकुंदा नवीन भौषधी भांडाराचे बांधकाम करणे (92.13 लक्ष), उप जिल्हा रुग्णालय गोकुंदा कर्मचारी निवास्थानाची दुरुस्ती करणे (80.25 लक्ष), उप जिल्हा रुग्णालय गोकुंदा फर्निचर पुरवठा करणे (17. 59 लक्ष),
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात रुग्णालये दुरुस्ती व बांधकामाकरिता एकूण तीन कोटी सतरा लक्ष आठ हजार निधीची कामे मंजूर करून तातडीने निधी उपलब्ध करून दिला आहे. याबद्दल पालकमंत्री अशोक चव्हाण व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आमदार भीमराव केराम यांनी आभार मानले आहेत.




No comments:
Post a Comment