*राजश्रीताई हेमंत पाटील यांना मातृशोक* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, April 27, 2021

*राजश्रीताई हेमंत पाटील यांना मातृशोक*

 





नांदेड: खासदार हेमंत पाटील यांच्या सासूबाई व गोदावरी समूहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या आई तथा यवतमाळ येथील महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष दिवंगत बाबासाहेब महल्ले यांच्या पत्नी पुष्पाताई महल्ले यांचे कोरोना आजाराने मुंबई येथील जसलोक हॉस्पिटल  मध्ये निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ७२ वर्षे होते.

           

पुष्पाताई यांची कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रविवार (दि. १८ एप्रिल) रोजी नांदेड येथील अपेक्षा हॉस्पिटल मध्ये  दाखल  करण्यात आले होते. उपचार सुरू असून सुद्धा त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत नसल्याने आणि उपचाराला प्रतिसाद देत नसल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेने जसलोक हॉस्पिटल मुबंई येथे नेण्यात आले. सोमवार पासून उपचार सुरू असतांना आचनक  सकाळ पासून तब्येत खालावली होती व उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता. अश्यातच मंगळवार (दि.27) दुपारी  3 वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगी राजश्रीताई  पाटील, पुतणे,नातवंड असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर शासकीय नियमानुसार वरळी,मुबंई येथिल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे कळविले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News