शिक्षणातील दीपस्तंभ :मातोश्री कमलताई ठमके -सुरेश यादवराव पाटील - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, April 25, 2021

शिक्षणातील दीपस्तंभ :मातोश्री कमलताई ठमके -सुरेश यादवराव पाटील

 


                                

   

    स्त्री ही निसर्गाने दिलेली  महान देणगी आहे. आई,बहीण,पत्नी  मैत्रीण,अशा किती तरी भूमिका त्या पार पाडत असतात. महीलांनी  शेतीचा शोध लावला,साहित्य,संगीत,कला,क्रिडा,उदयोग, राजकीय, व इतर सर्व क्षेत्रात भरारी घेतली आहे.अशाच एका शिक्षणासारख्या  पवित्र कार्यामध्ये स्वत:ला पूर्णत: झोकून देवून चंदना सारखे झीजून नांदेड जिल्हयातील किनवट सारख्या अतिदुर्गम आदिवासी तालुक्यात पाडा, गुडी, तांडा,वाडी,वस्तीया  बहूभाषीक गोर ‍ गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मातोश्री कमलताई आंनदराव ठमके यांनी महान कार्य केले आहे.‍    

     आई हरणाबाई  व वडील अर्जुन मुनेश्वर यांना सात आपत्ये होती.  जनूकाही सप्त स्वर राम,गोविंद, बळवंत हे मुल तर राधा,सगुणा, निर्मला व शैडंफळ म्हणजे कमला हे सर्वात लहान असल्यामूळे  कमला चा सर्वजन लाड करायचे.अर्जुन मुनेश्वर यांची परिस्थीती बेताची पण त्यांनी न डगमगता सर्व मूलांना शिक्षण देवून स्वत:च्या पायावर उभे  करून स्वावलंबी बनविले.राधा व सगुणा या बहीणी गृहणी तर इतर भाऊ बहीण नौकरीला होते. त्यावेळीची परिस्थीतीनुसार मुलींना शिक्षण देणे व घराबाहेर पडून नौकरी  करणे एकदम समाजाच्या विरोधात होते. अशा या बुरसट,जुनाट, मनुवादी , रुढी परंपरेला छेद देवून कमलताईनी आपले शिक्षण पूर्ण करून शिक्षिका म्हणुन यवतमाळ जिल्हयातील राळेगाव  प.‍ समितीमध्ये रूजू झाल्या.ज्ञानदानाचा महान कार्य सूरू झाले. प्रेमळ स्वभावाच्या असल्यामूळे लवकरच विद्यार्थी प्रिय शिक्षीका झाल्या. 

    विदर्भातील परीवर्तनवादी मुनेश्वर परीवाराची किर्ती सर्वत्र पसरू लागली आहे. अशातच विज्ञानवादी संत ‍चिमणाजी महाराज याच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या मराठवाडयातील किनवट तालुक्यातील  अंबाडी येथील दानशुर ठमके परीवारावारातील आंनदराव ठमके यांच्याशी त्यांचा विवाह झाला. विदर्भ मराठवाडा असा ऋणातूबंध जूळला. राळेगाव येथील नौकरी सोडून किनवट येथे शिक्षीका म्हणून रूजू झाल्या.‍विवाहानंतर कमलताईचे जीवन खडतरच होते.परंतू कुंटुंबाची व शालेय नौकरी त्यांनी न डगमगता समर्थपणे पेलली.त्यांच्या मन मिळावू व प्रेमळ स्वभावामूळे  त्यां सर्वामध्ये ‍प्रिय होत्या. हाडामासाच्या शिक्षीका असलेल्या कमलताईनी ‍शिकविलेले विद्यार्थी नौकरी, शेती, उदयोग,या सर्व क्षेत्रात अग्रेसर असून मोठया अभीमानाने आम्ही ताईचे विद्यार्थी आहोत म्हणून सांगतात. आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थी घडवित असतांना त्यांच्या मनात आपली एखादी संस्था असावी असे ‍विचार आले. पती आंनदराव ‍यांच्या साथीने ‍ मिलींद शिक्षण प्रसारक मंडळ  अंबाडी संचलित महात्मा ज्योतिबा फुले विद्यालाची गोकुंदा ता.किनवट येथे १९८१ स्थापना केली. या कामी पांडुरंग ठमके यांनी मौलाचे सहकार्य केले . स्वंय खर्चाने दहा वर्ष शाळा चालविली हे सर्व काही करत असतांना असंख्य अडचणीचा महापूर आला. आर्थीक व इतर असंख्य अडचणीवर त्यांनी त्यावर धाडसाने मात करून धैर्याने समोर जावून शैक्षणीक रोप लावले. १९८३ला कनिष्ट महाविदयालय सूरु केले. आज इवलेसे रोप लावियले द्वारी तयाचा वेणू गेला गगनावरी म्हणजे साता समुद्रापार इंग्लड येथील शैक्षणीक संस्थेशी या शाळेचे  शिक्षक,विदयार्थी संवाद साधतात. ब्रिटीश कौन्सींल तर्फे इंटरनॅशनल ग्लोबल ॲवार्ड २०१५-१६ ला मिळाला .सर्व धर्माचे विदयार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. हे सार करीत असतांना कमलताईचे कुटुंबाकडेही लक्ष होते. अभी.प्रशांत, डॉ. माधुरी, विदया, गजेंद्र यांच्यावर सुसंस्कार करून त्यांना घडविले. गोकुंदा येथील कमलानंद बंगल्यावर कोणीही व्यक्ती येवो. माहेरचे असो की सासरचे किंवा इतर कामांसाठी आलेल्यांना कमलताई हसत मुखाने त्यांचे स्वागत करायच्या जेवन केले का हे विचाराच्या नाहीतर चहापाणी , नास्ता करून देऊन अडी अडचणीत असलेल्या  गोरगरीब लोकांची मदत करायच्या. साधी राहणी व उच्च विचार अस त्यांच व्यक्तीहत्व होत. स्वत:हा शिक्षकांच्या घरी जाऊन त्यांच्या सुख दु:खाची विचारपूस करायच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या सुखा दु:खात जातीनी मिसळायच्या. त्या मातृवाचा वसा शिक्षणमहर्षी अभी. प्रशांत ठमके व त्यांच्या सुविद्य पत्नी, सावित्रीमाई फुले विचारमंचच्या अध्यक्षा प्रा. शुभांगी ठमके समोर नेत आहेत.मुलींनी, महीलांनी तर शिक्षण घेतलच पाहीजे तर आपल्या कुटुंबाची पर्यायाने देशाची प्रगती होते.असे कमलताईचे मौलीक विचार होते. म्हणुन १९६५ ला आदर्श वस्तीगृह, रमामाता वस्तीगृह,संघमित्रा वस्तीगृह माहूर,किनवट ,घाटंजी, येथे खास मुलीसाठी सुरु केले .डॉ. बाबासाहेब आंबेडकर  वस्तीगृह मुलासाठी किनवट येथे सूरू केले. वंचीत खेडयापाडयातील मुले मुली ‍शिकली.  

    आपल्या शिक्षण संस्थेतील शिक्षकांना  त्या आपले घरचेच कुटुंब आहे असे ते समजायच्या सुरुवातीला शिक्षकांना पगार नव्हता त्यावेळी  स्वत:च्या पगारातून त्यांच्या आर्थीक अडचणी दूर करायच्या म्हणून ‍शिक्षक लोक आताही त्याच डोळयात आश्रू आणून अंतरीय  आठवण काढतात. सुरुवातीला मूले शाळेत टीकत नव्हती. त्यावेळी शिक्षकांना धीर देत त्या म्हणत थांबा काही दिवसांनी आमचा  प्रशांत शाळा हातात घेऊन पुढे नेईन. अन तसेच झाले. त्यांनी लावलेले रोपटे वटवृक्षातबहरल महाराष्ट्रात अग्रनांमाकीत शैक्षणीक संस्थेमध्ये या शाळेच नाव झाले आहे. या संस्थेतून  असंख्य वैद्यकीय आधीकारी, इंजिनिअर, कृषि, प्राध्यापक, शिक्षक व इतर क्षेत्रात महाराष्ट्र व देशात सेवा करीत आहेत. विदयार्थांना दर्जेदार ‍शिक्षण मिळावं ही कमलताईची तळमळ पूर्ण  झाली आहे .

    भाऊ गोविंदराव वहीणी लिलाबाई यांच्या प्रेमळ हाताची स्वादीष्ट  तिळाची चटणी भरलेल्या वांग्याची भाजी व ज्वारीची भाकरी अत्यंत आवडीने खायच्या. त्यांना श्रीमंतीचा गर्व नव्हता. प्रत्येक  नातेवाईकाला त्यांच सांगण होत की कमलानंद गोकुंदा येथे येतांना वरीलप्रमाणे डबा घेवून या बस मला काही नको पिशवीतून डबा घेऊन आनलेला पाहीला की  त्या आवडींने खावून टाकत असत. त्यांचे आवडीच जेवण होते. कोणत्याही बडेजावपणा नाही गरीबीची पूर्ण जाणीव होती . प्रत्येकाने कठोर परीश्रम घ्यावे  यश आपलेच मिळते . असा त्यांचा संदेश होता आज असंख्य विद्यार्थी या शाळेतून घडले आहे. कर्मचारी व त्यांच्या लेकराबाळांचा अशीर्वाद त्यांनी घेतला आहे. त्यांना वाताचा  आजार होता. अशा या महान माऊलीचे निधन २५ एप्रिल २००० रोजी झाले. नभांगणातील चंद्र, सुर्य आणी असंख्य इवल्याशा तारका असे पर्यंत कमलताईचं नाव इतिहासात अजरामर रहील. त्याच्या स्मृतींना  कोटी कोटी विनम्र अभिवादन !

-सुरेश यादवराव पाटील (शिक्षक )

   राजषी शाहू नगर, गोकुंदा ता.किनवट जि. नांदेड

मो. नं.९९२११००५८०

ई.मे:- singet.kinwat@gmail.com


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News