रेमडेसीविर उत्पादन कंपनीला अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची भेट · उत्पादन वाढविण्याचे आवाहन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, April 30, 2021

रेमडेसीविर उत्पादन कंपनीला अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची भेट · उत्पादन वाढविण्याचे आवाहन

 



 

मुंबई : कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसीविर या औषधाचा पुरवठा सुरळीत व्हावा तसेच त्याचे उत्पादन  कसे वाढवता येईल याची पाहणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, यांनी विविध औषध निर्मिती कंपन्यांना प्रत्यक्ष भेट दिली आहे. कंपनीने उत्पादनात वाढ करावी, दर्जेदार औषधे रुग्णांना उपलब्ध व्हावी यासाठी उत्पादकांनी प्रयत्नशील रहावे, असेही आवाहन डॉ. शिंगणे यांनी या कंपन्यांना केले आहे.


          राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे व  त्यावर उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसीविर या औषधाचा तुटवडा भासत आहे. रेमडेसीविर या औषधाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी त्याचे उत्पादन कसे वाढवता येईल या अनुषंगाने डॉ. राजेंद्र शिंगणे, यांनी तारापूर MIDC तील मे. कमला लाईफ सायन्सेस या उसनवारी परवान्यावर काम करणाऱ्या कंपनीस भेट दिली व कंपनीच्या उत्पादन क्षमतेचा व प्रत्यक्ष होत असलेल्या उत्पादनाचा आढावा घेतला. कंपनी दर दिवशी 35000 रेमडेसीविर vial ची निर्मिती करत असून कंपनीने आतापर्यंत 6 लाख vials ची निर्मिती केली आहे, त्यातील 4 लाख vial सिप्ला कंपनीस दिल्या व सुमारे 2 लाख vials पॅकिंगच्या प्रक्रियेत आहेत, असे कंपनीचे चेअरमन डॉ. झंवर यांनी सांगितले.


                     या कंपनीची रेमडेसीविर  liquid injection व lyophilized injection   निर्माण करण्याची एकत्रित क्षमता 2 लाख vials दर दिवस इतकी आहे.


          मे. कमला लाईफ सायन्सेस ही injection निर्मिती करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी असून, ती  त्यांच्या क्षमतेच्या 10 टक्के उत्पादन सिपलासाठी करते व उर्वरित इतर औषधाचे उत्पादनासाठी इतर कंपन्या साठी करते.


             कंपनी जुबिलेंट, हेटेरो, डॉ. रेड्डीज इ. यांचेसाठीही रेमडेसीविर इंजेक्शन उत्पादन करणार असल्याचे डॉ. झंवर यांनी सांगितले.


          सिप्ला कंपनीचा रेमडेसिविर injection साठी लागणारा API (Active pharmaceutical ingredients) त्यांचेकडे असून ते liquid injection च्या 35000 च्या 3 बॅचेस व lyophilized injection ची एक बॅच तयार करू शकतात. उत्पादनासाठीचा सहाय्यक घटक Betadex आयात केला जातो, त्याची कमतरता असल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होत असल्याचे डॉ. झंवर यांनी सांगितले. घटक पुरेश्या प्रमाणात उपलब्ध झाल्यास अधिक उत्पादन करता येईल व रेमडेसीविर चा तुटवडा निर्माण होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.


          त्यानंतर डॉ. शिंगणे यांनी तारापूर MIDC येथिल  मे. नेप्रड प्रा. ली. या कंपनीस भेट दिली. ही कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज या कंपनीसाठी रेमडीसीविर इंजेक्शन (lyophilized) उसनवार परवान्यावर निर्माण करते. त्यांची पहिली  बॅच 12 मे, 2021 रोजी बाजारात येईल. त्यांची रेमडीसीविर lyophilized निर्माण करण्याची क्षमता 15000 vials प्रतिदिन व liquid injection ची क्षमता 12000 vials प्रतिदिन आहे.


          Lyophilized injection च्या पहिल्या बॅचच्या  4 दिवसानंतर दुसरी बॅच घेता येते . Sterility testing साठी 14 दिवस लागतात. हैदराबाद येथील प्रयोगशाळेत express sterility टेस्टिंगची परवानगी मिळाल्यास टेस्टिंग 2 दिवसात करता येईल व 6 दिवसात बॅच release करता येईल.


            तसेच liquid Inj ची बॅच दररोज उत्पादन करुन चाचणी हैद्राबाद येथे केल्यास तिसऱ्या दिवशी बॅच Release करता येईल, अशा प्रकारे राज्यात Remdesivir चे उत्पादन वाढविता येईल व मागणी पूर्ण करता येईल, असेही दोन्ही उत्पादक कंपन्यांकडून सांगण्यात आले.


            या भेटीत शासन व अन्न व औषध प्रशासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन डॉ. राजेंद्र शिंगणे, यांनी दिले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News