*प्रादेशिक परिवहन विभागाचे 100 टक्के महसुल उद्दीष्ट पूर्ण* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, May 8, 2021

*प्रादेशिक परिवहन विभागाचे 100 टक्के महसुल उद्दीष्ट पूर्ण*






नांदेड (जिमाका) दि. 8 :-  कोव्हीड -19 च्या विपरीत परिस्थितीत प्रादेशिक परिवहन विभागाने सन 2020-21 या आर्थिक वर्षात 100 टक्के महसुल उदिष्ट पूर्ण केले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आहेत. आगामी काळातही परिवहन विभाग महसूल वृध्दीसाठी प्रयत्नशिल राहील असे, प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी कळविले आहे.

 

नांदेड परिवहन विभागामार्फत सन 2020-21 या आर्थिक वर्षात रु. 148.01 कोटी रकमेचा महसुल शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला आहे. नांदेड विभागास शासनाकडून देण्यात आलेल्या रु. 117 कोटी इतक्या लक्ष्यांकाच्या तूलनेत 126 टक्के लक्ष्यांक प्राप्त करण्यात आले आहे. सन 2020-21 या आर्थिक वर्षात आकर्षक, पसंतीच्या वाहन वाटपातून सुमारे रु. 1.72 कोटी इतका महसूल जमा करण्यात आला.

 

नांदेड परिवहन विभागाच्या अखत्यारित असलेल्या नांदेड, परभणी व हिंगोली या कार्यालयांच्या वायुवेग पथकांनी गेल्या आर्थिक वर्षात रु. 5.73 कोटी इतक्या रकमेचा दंड व थकीत कर वसूली केली आहे. वायुवेग पथकांना देण्यात आलेल्या रु. 5.76 कोटी इतक्या लक्ष्यांकाच्या तुलनेत 99.48 टक्के एवढे लक्ष्यांक पूर्तता केली  आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News