नांदेड : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार (१० मे २०२१ ) रोजी भीमघाट,नांदेड येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८ वा श्रमदान, १० वा. रांगोळी स्पर्धा,
पाहिलं पारितोषिक स्मृतीशेष सटवाजीराव नरवाडे खुरगावकर यांचे स्मृतीप्रित्यर्थ,द्वितीय पारितोषिक स्मृतीषेश सुनील मोरे यांचे स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणार आहे.
सका.११ वा. बुद्ध-भीम गीत गायन स्पर्धा
प्रथम पारितोषिक स्मृतीशेष ताराबाई निवृत्ती ढवळे यांचे स्मृतीप्रित्यर्थ,द्वितीय पारितोषिक स्मृतीशेष सटवाजीराव नरवाडे खुरगावकर यांचे स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणार आहे.
दुपारी १२ वा वृक्तुत्व स्पर्धा
विषय : वंचितांना न्याय प्रकाश आंबेडकरच देऊ शकतात
प्रथम पारितोषिक स्मृतीशेष चोखोबा पहेलवान जोंधळे यांचे स्मृतीप्रित्यर्थ,द्वितीय पारितोषिक स्मृतीशेष पारुबाई कदम यांचे स्मृती प्रित्यर्थ तृतीय पारितोषिक स्मृतीशेष बाबुराव निलंगेकर यांचे स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणार आहे.
दुपारी २ वा स्नेह भोजन (सर्वांनी सोबत डब्बा आणायचा) दुपारी ३ वा लाठी काठी कवायत प्रशिक्षीत प्रदर्शन होईल.
सायंकाळी ०५ वा. बक्षीस वितरण व समारोप मान्यवरांची उपस्थितीत होणार आहे.
या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मा.प्रकाश आंबेडकर वाढदिवस महोत्सव समितीच्या वतीने रोहन कहाळेकर,अनिता भोळे,कनिष्क सोनसळे यांनी केले आहे.




No comments:
Post a Comment