दिगंबर धर्माजी पाटील यांचे निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, May 10, 2021

दिगंबर धर्माजी पाटील यांचे निधन

 





हिमायतनगर (नांदेड ) : येथून जवळच असलेल्या सिरंजनी येथील प्रतिष्ठीत नागरीक दिगंबर धर्माजी पाटील (वय 70 वर्षे )  यांचे  सोमवार (दि.10) रोजी सकाळी 11:00 वाजता अल्पशा आजाराने सिरंजनी येथील निवासस्थानीच निधन झाले.  त्यांचे पार्थिवावर सोमवार (दि.10) रोजी सायंकाळी 05:00 वाजता सिरंजनी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात  आले. 

         त्यांचे पश्चात पत्नी, पाच मुली, एक मुलगा, जावई, सुन, नातवंडं असा मोठा परिवार असून  दै.आदर्श गावकरी (औरंगाबाद) चे कार्यकारी सपांदक सुरेश पाटील यांचे ते वडील होत.

            दिगंबर पाटील हे कास्मॉपॉलिटन शिक्षण संस्थेच्या संस्थापक कार्यकारिणीतील विश्वस्त होते.  काहीकाळ त्यांनी कॉस्मॉपॉलीटन विद्यालयात शिक्षक म्हणूनही काम केले होते. अत्यंत नेमस्त हजरजबाबी स्वाभीमानी असलेले पाटील यांनी उतारवयात सिरंजनी येथेच शालेय विद्यार्थ्यांची शिकवणी घेतली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय उराशी बाळगूण गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी ते शेवटच्या श्वासापर्यंत धडपडत होते. त्यांच्या आकस्मिक जाण्याने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील फार मोठी हानी झाली आहे.

भावपूर्ण आदरांजली..


अत्यंत वाईट बातमी : दिगंबर पाटील विश्वासार्ह..एक चांगले व्यक्तिमत्त्व.. मेहनतीने काम करणारा..गणित आणि इंग्रजीचे चांगले ज्ञान. शिक्षणाचे महत्त्व त्यांना माहित होते .. म्हणून त्यांनी आपला मुलगा  सुरेश पाटील यांना पदव्युत्तर पदवीधर होई पर्यंत शिकवले ... याकरिता त्यांनी अथक  प्रयत्न केले. आजपर्यंत त्यांच्या मुलाने महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तपत्रांमध्ये संपादकीय विभागात महत्वपूर्ण काम केले. एमए, बीजे व एमएमसीजे मध्ये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , औरंगाबाद येथून  सुवर्णपदक पटकाविले आहे. त्यांनी प्रत्येक क्षेत्राचे ज्ञान मिळविले आहे .. जसे की .. सामाजिक..अर्थशास्त्र ...इंग्लिश...

         आज आपल्या समाजातून जाणकार ज्ञानी मोठे व्यक्तिमत्वास..आपण  नेहमीसाठी मुकलो ... त्यांच्या पावन स्मृतिंना भावपूर्ण आदरांजली. 


-ऍड.उत्तम गोविंदराव गिमेकर,नांदेड .


माझे बाबा दिगंबर पाटील यांचे आज निधन झाले. कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून ७०च्या दशकात किनवट या आदिवासी, दुर्गम तालुक्यात प्राथमिक/माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पदरमोड करून त्यांनी मित्रांसह ही संस्था उभारली. त्यातच ते कंगालही झाले होते. आदिवासी/दुर्गम भागातील मुले शिकली पाहिजे ही त्यांची तळमळ आणि ध्यास होता. परंतु काही घरभेद्यांनीच दगा दिल्यामुळे ही संस्था पुढे त्यांच्या हातात राहिली नाही.

- सुरेश पाटील,

 

कार्यकारी संपादक,

दै. आदर्श गावकरी,

औरंगाबाद

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News