नांदेड (जिमाका) दि. 10 :- तेलगंना जि. निर्मल रा. कुंटूर ह.मु.मचकल मंडळ मुधोळ येथील अर्जदार राधा शिवाजी वाघमारे वय 40 वर्ष व्यवसाय घरकाम/मजुरी यांनी दि. 7 मे 2021 रोजी येथे दिलेल्या अर्जानुसार त्यांची मुलगी नामे कार्तीका ऊर्फ कोमल शिवाजी वाघमारे वय्-40 वर्ष व्यवसाय शिक्षण 25 एप्रिल 2021 चे 8 वाजता हेडगेवार चौक नायगाव येथून कोणास काहीएक न सांगता निघून गेली आहे ती आजपावेतो घरी परत आली नाही वेगैरे मजकुराचे अर्जावरुन पो.स्टे. ला. मिसींग क्र. 10/2021 प्रमाणे नोंद घेवून पुढील चौकशी आम्ही स्वत: करीत आहोत. तरी आपले पो.स्टे. हादीत ताबे पोलीस मार्फत या मुलाचा शोध होवून तो मिळून आल्यास पोलीस स्टेशन नायगावला कळवावे.
हरविलेल्या व्यक्तीचे वर्णन- रंग-गोरा, उंची-5 फुट, वय-20 वर्षे, अंगावर कपडे-पिवळया रंगाचा पंजाबी ड्रेस , बाधा- मजबुत, आवगत भाषा- मराठी, हिंदी, तेलगु पोलीस स्टेशन नायगाव -02465262133 व चौकशी अंमलदार-7875643333 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोना/349 पो. स्टे. नायगाव, एस.एन. सांगवीकर यांनी केले आहे.
हरवलेली व्यक्ती आढळल्यास
नायगाव पोलीस स्टेशनला माहिती कळवावी
नांदेड (जिमाका) दि. 10 :- अर्जदार नामे अमोल व्यंकटराव हानमंते वय 24 वर्षे, व्यवसाय शिक्षण रा. बेंद्री ता. नायगांव यांनी 19 एप्रिल 2021 रोजी अर्ज दिला आहे की, त्यांचे वडील व्यंकटराव लक्ष्मण हाणमंते वय-46 वर्षे हे 15 एप्रिल 2021 रोजी बेंद्री येथून हंगरगा येथे जातो म्हणून दुपारी 1. 30 ते 2 वाजेच्या दरम्यान घरुन गेले ते आजपपर्यत घरी परत आले नाही. मजकुराचे अर्जावरुन पो.स्टे. नायगांव येथे मिसिंग क्र. 08/2021 दाखल असून या मिसींगची चौकशी सुरु आहे.
हरविलेल्या व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे- हरविलेल्या इसमाचे नाव- व्यंकटराव लक्ष्मण हाणमंते वय- 46 वर्षे रा. बेंद्री ता. नायगांव जि. नांदेड , रंग- सावळा, उंची-5.5. फूट, बांधा-सडपातळ, केस-काळे, पोशाख-शर्ट, पॅन्ट, बोली भाषा- हिंदी, मराठी, मो.क्र. 7558565358 तरी वरील वर्णनाच्या हरविलेल्या इसमाचा शोध होऊन आढळल्यास पो. स्टे. नायगांव (बा) येथे कळवावे. तसेच संपर्कासाठी पोलीस स्टेशन नायगांव यांचा फोन क्र. 02465262133 वर संपर्क साधावा असेही एस. एम. सांगवीकर, पोलीस नाईक /349, पोलीस स्टेशन नायगांव मो.क्र.7578643333 सर यांच्याशी संपर्क साधावा असेही कळविले आहे.




No comments:
Post a Comment