538 कोरोना बाधित झाले बरे नांदेड जिल्ह्यात 294 व्यक्ती कोरोना बाधित 12 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, May 10, 2021

538 कोरोना बाधित झाले बरे नांदेड जिल्ह्यात 294 व्यक्ती कोरोना बाधित 12 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

 

 






नांदेड (जिमाका) दि. 10 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  हजार 936 अहवालापैकी 294 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 273 तर अँटिजेन तपासणीद्वारे 21 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 85  हजार 225 एवढी झाली असून यातील 78  हजार  197  रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला  5  हजार  18 रुग्ण उपचार घेत असून 183 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक 8 ते 10 मे या दोन दिवसांच्या कालावधीत 12  रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 727 एवढी झाली आहे. दिनांक 8 मे रोजी मुखेड कोविड रुग्णालय येथे रामनगर मुखेड येथील 46 वर्षाची महिला, डेल्टा कोविड रुगणालय येथे किनवट तालुक्यातील कुपटी येथील 42 वर्षाचा पुरुष, दि. 9 मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे किनवट तालुक्यातील कोठारी येथील 59 वर्षाचा पुरुष, बिलोली येथील 73 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे शक्ती नगर बारड येथील 50 वर्षाचा पुरुष, हनुमान नगर नांदेड येथील 45 वर्षाचा पुरुष, यशश्री कोविड रुग्णालय येथे देगलूर तालुक्यातील दोसनी येथील 52 वर्षाचा पुरुष, ओ कोविड रुग्णालय येथे हिमायतनगर बोरगडी तांडा येथील 55 वर्षाचा पुरुष, यशोसाई रुग्णालय येथे किनवट तालुक्यातील वाझा बु. येथील 50 वर्षाचा पुरुष,  दि. 10 मे रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथील 75 वर्षाची महिला, विष्णुनगर नांदेड येथील 65 वर्षाची महिला गुरुजी कोविड रुगणालय येथे आशिष नगर नांदेड येथील 55 वर्षाच्या पुरुष यांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.72 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 92, बिलोली 6, कंधार 14,मुदखेड 2, धर्माबाद 9, परभणी 6, नांदेड ग्रामीण 12, देगलूर 10, किनवट 16, मुखेड 14, यवतमाळ 3, अर्धापूर 12, हदगाव 15, लोहा 16, नायगाव 14, हिंगोली 6, भोकर 7, हिमायतनगर 6, माहूर 10, उमरी 1, आदिलाबाद 2

असे एकूण 273 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात 4, देगलूर 4, मुखेड 4, नांदेड ग्रामीण 3 हिमायतनगर 1, अर्धापूर 1, कंधार 1, बिलोली 1, किनवट 2 असे  एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे 21 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 538 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 12, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 255, धमार्बाद तालुक्यातंर्गत 8, देगलूर कोविड रुग्णालय 2, अर्धापूर तालुक्यातंर्गत 26, उमरी तालुक्यातंर्गत 4, खाजगी रुग्णालय 87, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 14, मुखेड कोविड रुग्णालय 30, मुदखेड कोविड केअर सेंटर 19, किनवट कोविड रुग्णालय 13, कंधार तालुक्यातर्गंत 13, बिलोली तालुक्यातर्गंत 5, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 1 , बारड कोविड केअर सेटर 3 , माहूर तालुक्यातर्गंत 11 , हदगाव कोविड रुगणालय 24, लोहा तालुक्यातर्गत 10 , मालेगाव टीसीयु कोविड रुग्णालय 1, असे 538 बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली .   

 

आज 5 हजार 18 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय 149जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 80जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ( नवी इमारत) 104शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 35, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 70, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 60, देगलूर कोविड रुग्णालय 20, जैनब कोविड हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 21, बिलोली कोविड केअर सेंटर 100, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 12, नायगाव कोविड केअर सेंटर 7उमरी कोविड केअर सेंटर 23माहूर कोविड केअर सेंटर 19भोकर कोविड केअर सेंटर 5हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 34, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 25, कंधार कोविड केअर सेंटर 8, धर्माबाद कोविड केअर सेंटर 36 , मुदखेड कोविड केअर सेंटर 16, अर्धापूर कोविड केअर सेंटर 11, बारड कोविड केअर सेंटर 27, मांडवी कोविड केअर सेंटर 6, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 9, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 17एनआरआय कोविड केअर सेंटर 48नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 1 हजार 384 नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 1 हजार 701, खाजगी रुग्णालय 990, असे एकूण 5 हजार 18 उपचार घेत आहेत. 

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 15, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 49, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 54, भक्ती जम्बो कोविड केअर सेटर 29  खाटा उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 85 हजार 920

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 90 हजार 649

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 85 हजार 255

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 78  हजार 197

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 727

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.72 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-10

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-31

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-264

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 5 हजार 18

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-183

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News