नारनूर जि. आदिलाबाद ( तेजेराव मस्के ) : सामाजिक , आर्थिक व राजकीय समस्यांच्या समाधानासाठी आपण संघटितपणे संघर्ष केला पाहिजे. या विचाराने एकत्र आलेल्या टीआरएस महार बटालियनची आदिलाबाद जिल्ह्यातील नारनूर येथे शनिवारी (दि.17 ) रोजी बैठक संपन्न झाली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून जय भीम.. जय महार बटालियन अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. गगनचुंबी घोषणांनी परिसर दणाणला होता. महानायकांना सर्वांनीअभिवादन केल्यानंतर बैठकीस प्रारंभ झाला. जिल्ह्यातील अनेक ने त्यांनी आपल्या भाषणातून महत्वपूर्ण विचार मांडले. महार हा सामाजिक वर्ग सामाजिक, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. ह्या भागातील महार शेतकर्यांच्या जमिनीचे प्रश्न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. ते तातडीने सोडवायचे आहेत.
यावेळी कार्यकर्त्यांनी आम्हाला राजकीय क्षेत्रात आमच्या हक्काच्या योग्य त्या जागा मिळाल्या पहिजेत अशी मागणी केली. ह्या आमच्या मागण्या पूर्ण झाली नाही तर महार बटालियन यासाठी लढायला तयार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. आपले प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित पुढे यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.





No comments:
Post a Comment