किनवट : लोकनेते खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महिला मोर्चा किनवटच्या वतीने तालुक्यातील आशा वर्कर्संना छत्री आणि कोरोना योध्दा प्रमाणपत्र देण्यात आले.
बुधवार (दिनांक 3 ऑगस्ट 2021 ) रोजी येथील साईकल्याण मंडपम् साईबाबा मंदिर येथे भाजपा महिला मोर्चा तालुका अध्यक्षा किनवट सागरताई शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आशा वर्कर यांना छत्री सप्रेम भेट आणि कोरोना योध्दा प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ आणि महिला शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. कार्यक्रमाचे उद्घाटक लोकप्रिय आमदार भीमराव केराम साहेब होते. प्रमुख अतिथी भाजपा महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा चित्ररेखा शाहुराज गोरे पाटील यांच्या हस्ते आशा वर्कर यांना छत्री सप्रेम भेट देऊन कोरोना योध्दा प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, सुधाकर भोयर, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्या संध्याताई राठोड, , भाजपा तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, भाजपा शहर अध्यक्ष श्रीनिवास नेमेनिवार, भाजपा महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सुकेसनी कपाटे, केतकी चौधरी, डुमनेताई, भाजपा महिला जिल्हा कार्यकारिणी सदस्या भावना दीक्षित, भाजपा जिल्हा पत्रकार प्रकोष्ट पद्मा गिरे, गंगुबाई परेकर, विद्याताई पाटील, मणिषा चौधरी, वंदना गादेकर ,सविता चव्हाण, ज्योती साळवे, महिला मोर्चा माहुर तालुकाध्यक्षा अश्विनी पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष उमाकांत कराळे , जितेंद्र कुलसंगे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. बालाजी गिते यांनी सुत्रसंचालन केले. या प्रसंगी 100 छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा महिला मोर्चा शहर अध्यक्षा पुनम दीक्षित आणि भाजपा महिला मोर्चा ओबीसी जिल्हा उपाध्यक्षा पायल जैस्वाल यांनी परिश्रम घेतले.




No comments:
Post a Comment