संवाद प्रागतिक विचार मंचाच्या राज्यस्तरीय कथास्पर्धेत डॉ. प्रभाकर शेळके,अजिनाथ सासवडे प्रथम,सोमनाथ एखंडे, अंकुश गाजरे द्वितीय तर भारती देव व गंगाधर ढवळे तृतीय पुरस्कारांचे मानकरी ; पुढील महिन्यात होणार पुरस्कारांचे वितरण - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, March 20, 2022

संवाद प्रागतिक विचार मंचाच्या राज्यस्तरीय कथास्पर्धेत डॉ. प्रभाकर शेळके,अजिनाथ सासवडे प्रथम,सोमनाथ एखंडे, अंकुश गाजरे द्वितीय तर भारती देव व गंगाधर ढवळे तृतीय पुरस्कारांचे मानकरी ; पुढील महिन्यात होणार पुरस्कारांचे वितरण

 


नांदेड : येथील संवाद प्रागतिक विचार मंचच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून कथाकार डॉ. प्रभाकर शेळके, आजिनाथ सासवडे ,सोमनाथ एखंडे, अंकुश गाजरे ,भारती देव, गंगाधर ढवळे, हरिश्चंद्र पाटील, दीपक तांबोळी ,भारत सोनवणे, माधवी देवळाणकर, राजेश्वरी कांबळे आदी पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. संयोजक डॉ. विलास ढवळे यांनी ही माहिती दिली. स्पर्धेस संयोजन साह्य  मिलिंद व्यवहारे व अनिता दाणे यांनी केले.

          डिसेंबर २०२१ मध्ये राज्यस्तरीय खुली कथा स्पर्धा जाहीर करण्यात आली होती. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक राज्यातील कथालेखकांसह विदेशातील मराठी भाषक लेखकांनी यासाठी कथा पाठविल्या होत्या. प्राप्त कथांपैकी ७६ कथा प्रथम परीक्षणातून निवडण्यात आल्या होत्या.

      प्रथम पुरस्कार जालना येथील डॉ. प्रभाकर शेळके यांच्या सरणफुलं या कथेस शांताबाई संभाजी ढवळे स्मृती पुरस्कार रुपये ३००० रोख सन्मानचिन्ह गौरव पत्र , तसेच बीड येथील अजिनाथ सासवडे यांच्या मेटे मामा या कथेस चंद्रकलाबाई ज्ञानोबाराव चौधरी स्मृती पुरस्कार रुपये ३००० रोख सन्मानचिन्ह व गौरव पत्र, द्वितीय पुरस्कार अहमदनगर येथील सोमनाथ एखंडे यांच्या आखाड्या या कथेस सुनीताबाई व सेनानी यशवंतराव रायबोले स्मृती पुरस्कार रुपये २००० रोख सन्मानचिन्ह व गौरवपत्र ,सोलापूर येथील अंकुश गाजरे यांच्या वाट या कथेस सावित्राबाई ग्यानोबाराव व्यवहारे स्मृती पुरस्कार रुपये २००० रोख सन्मानचिन्ह व गौरवपत्र , तृतीय पुरस्कार नाशिक येथील भारती देव यांच्या धानी या कथेस कपिला मुकेश वाघमारे स्मृती पुरस्कार रुपये १००० रोख सन्मानचिन्ह व गौरव पत्र, नांदेड येथील गंगाधर ढवळे यांच्या सोनकीडा या कथेस वाघजी रामजी वाघमारे स्मृती  पुरस्कार रुपये १०००,सन्मानपत्र व गौरवपत्र.

         विशेष कथा पुरस्कार  सोलापूर येथील हरिश्चंद्र पाटील यांच्या  शिरवाळ, जळगाव येथील दीपक तांबोळी यांची मुलगी तर  औरंगाबाद येथील भारत सोनवणे यांच्या सिमांतीनी या कथांना देण्यात आला आहे. औरंगाबाद येथील माधवी देवळाणकर यांची एक दिवसाचे मरण, सातारा येथील राजेश्वरी कांबळे यांची मी बी तुझ्यावर प्रेम करतो, नांदेड येथील मनोहर बसवंते यांची गंगा ,पुणे येथील प्रा.जयराम मुसळे यांची साकडे , डोंबिवली येथील सुनील जावळे यांची साथ ही साता जन्माची, बीड येथील विठ्ठल कुलकर्णी यांची देहवात, हैदराबाद येथील व्यंकटेश कुलकर्णी यांची प्राक्तन, संतोष पाटील यांची गुप्तधन, नांदेडचे  प्रज्ञाकिरण जमदाडे यांची परिवर्तन आणि व्यंकटेश काटकर यांच्या आई या कथांना  संवेदी कथा पुरस्कार देण्यात आला आहे.

   माधुरी चौधरी यांची देव माणूस बाप , मृण्मयी नारद यांची एक दीर्घांक सुखांताचा, सुमिता सबनीस पाठक यांची काशी एक परिक्रमा, सई लेले यांची बोडण, सारिका कुलकर्णी यांची रिकामटेकडी, डॉ. ज्योती रामपूरकर यांची अद्भुत भेट, डॉ. प्रतिभा जाधव यांची विद्या, नांदेड येथील रूपाली वागरे यांची उत्कट प्रेम ,राधिका मोहरील यांची योद्धा आणि कल्पना हरी गोगटे यांची काळे ढग या कथांना स्त्री जाणिवेच्या कथा हा पुरस्कार देण्यात आला आहे. मराठी साहित्य ग्रंथ ,गौरव पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

  गूढकथा- प्रवीण पगार यांची संशय, सहजीवन -ललित जोशी यांची लपंडाव, भास्कर बंगाळे यांची कोरोनानं  शिकवला धडा. विनोदी कथा- माधव फुलारी यांची नाटक पहावे करून, किशन उगले यांची पुरस्काराचं चांगभलं. इतर वाचनीय कथांमध्ये लक्ष्मीकांत दाभाडकर यांची क्रियाकर्म, प्रमोद शिरपूरकर यांची व्यवस्थेचा बळी, ना.सा.येवतीकर यांची हाताची जादू, प्रा. निलेश लोंढे यांची जगन, विद्या भडके यांची साथ, अर्चना पाटील यांची वंशाचा दिवा, सोनाली पेंडलवार यांची एक होते बाबा, वर्षा कैलास शिंदे यांची कथा आमची, उत्तम मुधळ तालंगकर यांची जिव्हाळा, डॉ.शंकर विभुते यांची परीक्षा, सुतेजा दांडेकर यांचे शुभस्य शीघ्रम, रमा गोपाळ परांजपे यांची ऋण, पुष्पा सामंत यांची कथा रामची, विजया पुरूषोत्तम जोशी यांची सांजवेळ वार्धक्याची, विजय पांढरीपांडे यांची अलविदा, रवींद्र बाबासो यांची ससेहोलपट, कार्तिक गवळी यांची कोंकण, कादंबरी देशमुख यांची धक्का न धक्का, कविता पाचंग्रे यांची कोपरा मनाचा भारत कांबळे यांची आई पाहिजे, लातूर येथील भारतकुमार गायकवाड यांची वाट या कथा वाचनीय आहेत.

        बालकथा लेखक अनुष्का माधव जुंबाड हिच्या अन्वी या कथेस बालकथा लेखन प्रथम पुरस्कार तर स्वराली  सुंदरराज वैद्य हिच्या देशप्रेम या कथेस द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला आहे .एका भव्य कार्यक्रमात पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News