दिपेवडगाव शाळेत कांबळे पुण्यस्मरण निमित्त शालेय साहित्य शिवजयंती निमित्तच्या स्पर्धांची बक्षिसे वाटप - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, March 20, 2022

दिपेवडगाव शाळेत कांबळे पुण्यस्मरण निमित्त शालेय साहित्य शिवजयंती निमित्तच्या स्पर्धांची बक्षिसे वाटप

 



केज (बीड) : तालुक्यातील जि. प. प्रा. शा. दिपेवडगाव शाळेत कांबळे पुण्यस्मरण निमित्त कांबळे कुटुंबीयांनी सर्व विद्यार्थ्यांना लेखन वाचन साहित्य तसेच शिवजयंती निमित्त घेतलेल्या विविध स्पर्धांची विविध  बक्षिसे वाटप करून  विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात आली. 

       शिवजयंतीनिमित्त शाळेत बाल सभेचे आयोजन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वेशभूषा घेण्यात आल्या. या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ ,समाज सहभागातून शाळेसाठी  वस्तूंची भेट, खाऊ वाटप इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.    

       सर्वप्रथम शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन करत अभिवादन करून इयत्ता सातवीच्या वर्गाने बाल सभा आयोजित केली.  या बाल सभेत विद्यार्थ्यांनी भाग घेत शिवरायांच्या जीवन चरित्रावर आपापली मनोगते व्यक्त केली. तसेच या मनोगता नंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये शिवरायांचा पाळणा, शिवराया वरील गीते यावर चिमुकल्यांनी नृत्य करत उपस्थितांची मने जिंकली. शिवजयंतीनिमित्त शाळेमध्ये विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, धावणे स्पर्धा , रांगोळी स्पर्धा व आझादी का अमृत महोत्सव निमित्त सूर्यनमस्कार स्पर्धा. या स्पर्धेमधील विजेत्यांना बक्षीस वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

       या कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी  सरपंच सुलक्षणा बालासाहेब चिंचकर या होत्या ; तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच बालाजी गुळभिले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  अंकुश तांबुरे, डॉ. मधुकर हरिभाऊ कांबळे ( कर्नल एमडी मेडिसिन अंबाजोगाई ), डॉ. विठ्ठल हरिभाऊ कांबळे (माजी पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त ), पाथरी येथील शिक्षिका कमलबाई संजय उजगरे -कांबळे, छायाताई विठ्ठल कांबळे , कांबळे कुटुंबाचे जावई तथा  भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा माळीवाडा पाथरी येथील शिक्षक संजय उजगरे  हेही उपस्थित होते. 

        याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेचे  मुख्याध्यापक श्रीमान तपसे सर यांचा मुलगा संकेत याचा  वैद्यकीय प्रवेश (MBBS ) झाल्याबद्दल शाळेच्या व गावकऱ्यांच्या वतीने शाल , श्रीफळ , फेटा बांधून सत्कार करण्यात आला. या सत्कारामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली.



              या कार्यक्रमाची शोभा वाढवली ती कांबळे कुटुंबीयांनी शिवजयंतीनिमित्त आयोजित स्पर्धांसाठी स्मृतिशेष हरिभाऊ कांबळे यांचे सातवे पुण्यस्मरण व स्मृतिशेष जनाबाई हरिभाऊ कांबळे यांचे तिसरे पुण्यस्मरण निमित्त कांबळे कुटुंबीयांनी सर्व विद्यार्थ्यांना लेखन वाचन साहित्य तसेच शिवजयंती निमित्त घेतलेल्या विविध स्पर्धांची विविध  बक्षिसे देऊन. मागील सहा वर्षापासून कांबळे कुटुंबीय दरवर्षी शिवजयंतीनिमित्त स्पर्धा आयोजित करून बक्षिसे देत आहेत.  याप्रसंगी या बक्षीस वितरणानंतर विद्यार्थ्यांना बसण्यासाठी कांबळे कुटुंबीयां मार्फत  ६ x ३० फुटाच्या आसनपट्ट्या शाळेसाठी समाज सहभाग रूपात देण्यात आल्या. तसेच गावातील उद्योजक  शामराव गुळभिले यांचेकडून शाळेस इन्व्हर्टर बॅटरी देणगी स्वरूपात देण्यात आली. या सर्वांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.   याप्रसंगी मान्यवरांनी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याचे आवाहन केले शेवटी आभार प्रदर्शनाने व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 

        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान तपसे,सहशिक्षक  कांबळे ,चव्हाण ,श्रीमती वाघचौरे व पाखरे यांनी परिश्रम घेतले. 

        बालसभेचे अध्यक्षस्थान कु. सई गुळभिले हिने भूषवले ; तर बालसभेचे सूत्रसंचलन कु. आदिती गुळभिलेने हिने केले . कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक, बहुसंख्य पालक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News