सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार (भाप्रसे) यांच्या हस्ते साने गुरुजी रुग्णालयात जम्बो ऑक्सिजन सिलेंडर व एक्स रे युनिटचे लोकार्पण - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, March 20, 2022

सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार (भाप्रसे) यांच्या हस्ते साने गुरुजी रुग्णालयात जम्बो ऑक्सिजन सिलेंडर व एक्स रे युनिटचे लोकार्पण

 


किनवट : जम्बो ऑक्सिजन सिलेंडर व एक्स रे युनिट चा लोकार्पण सोहळा सहायक  जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार (भाप्रसे) यांच्या हस्ते साने गुरुजी रुग्णालयात नुकताच संपन्न झाला.

           यावेळी गंगन्ना नेम्मानीवार,डॉ. शिरिष पत्की,अनुराग भस्मे,धरमसिंग राठोड,प्राचार्य डॉ. आनंद भंडारे व नारायणराव सिडाम यांची मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. रुग्णालयास ऑक्सिजन सिलेंडर एस.बी.आय.बँकेने, तर एक्सरे युनिट स्व.सदाबाई नथमलजी बलदोटा स्मृतिप्रित्यर्थ  पुण्याच्या बलदोटा परिवाराने भेट दिले आहे.


    साने गुरुजी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अशोक बेलखोडे यांनी प्रास्ताविक केले. नितिन टापरे यांनी सूत्रसंचालन केले. माजी नगराध्यक्ष के.मुर्ती यांनी आभार मानले. यावेळी वनाधिकारी श्री.खैरनार यांचे शुभेच्छा पर भाषण झाले. याच कार्यक्रमात पोलिस उप निरिक्षकपदी निवडीबद्दल सुप्रिया सुरेंद्र राठोड हिचा उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

    पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रा.डॉ. आनंद भालेराव, शिवराज राघुमामा, संतोष तिरमनवार, डॉ. शिवाजी गायकवाड, डॉ. किरण नेम्मानीवार, श्री.घुगे, वनाधिकारी श्री.आटपाटकर, विनायक गव्हाणे, वसंत पवार, अनिल सुर्यवंशी, म.आ.चौधरी, आशिष देशपांडे, सुरेंद्र राठोड, गंगाधर कदम, मिलिंद सर्पे, नसिर तगाले यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. यशस्वितेसाठी संजय बोल्लेनवार, ज्ञानेश्वर ऊईके,डॉ. काळे,श्री. दमन्ना,तेजस्विनी यांनी पुढाकार घेतला.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News