शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून समाजऋण फेडण्याच्या मिळालेल्या संधीचं सोनं करावं -गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, April 1, 2022

शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून समाजऋण फेडण्याच्या मिळालेल्या संधीचं सोनं करावं -गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने

 



किनवट : आपण स्विकारलेलं शिक्षक पद हे समाजऋण फेडण्यासाठीची नामी संधी आहे. तेव्हा आपण विद्यार्थ्यांच्या बौध्दिकतेसह सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी अविरत परिश्रम घ्यावे. शिक्षकांनी आयडीयाज निर्माण कराव्या आणि मिळालेल्या संधीचं सोनं करावं, असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी केले.

         महाराष्ट्र शासन व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या वतीने जिल्हा परिषद (मुलांचे) हायस्कूल येथे आयोजित " शाळापूर्व तयारी मेळावा : तालुकस्तर प्रशिक्षण " चा अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून प्रथमचे राज्य प्रमुख सोमराज गिरडकर, प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख सुलभक , तालुका संपर्क अधिकारी तथा डायटचे अधिव्याख्याता अभय परिहार, बालविकास प्रकल्प अधिकारी आश्विनी ठकरोड , प्रथमचे मराठवाडा विभाग प्रमुख शंकर पौळ, तौफीक सय्यद , शिक्षण विस्तार अधिकारी ना.ना. पांचाळ, मुख्याध्यापक मोहन जाधव उपस्थित होते. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सुलभक दयाल मोगरकर यांनी आभार मानले. भूमय्या इंदुरवार यांनी शाळापूर्व तयारी गीत गाईले.

         पुढे बोलतांना श्री महामुने म्हणाले, आपल्या मुलांनी नियमीत शाळेत जावे आणि उत्तम शिक्षण घ्यावे, ही सर्वांचीच इच्छा असते. मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून पालक, शिक्षक आणि समाज या नात्याने आपणच त्यासाठी पोषक वातावरण तयार केले पाहिजे. ज्याप्रमाणे शेतकरी जूनच्या पेरणी करिता एप्रिल- मे मध्ये शेतीची मशागत करून पेरणीपूर्व तयारी करतो. अगदी त्याप्रमाणे शिक्षकांनी जूनमध्ये शाळा सुरु होणार असल्याने त्यापूर्वी एप्रिल- मे मध्येच शाळापूर्व तयारी करून घेतलीघ्यावी.

         तालुक्यातील तेवीस केंद्रांतून प्रत्येकी दोन तंत्रस्नेही शिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात आले असून हे दोघे केंद्रस्तरीय मेळाव्यात सर्व शिक्षकांना शाळापूर्व तयारी प्रशिक्षण देतील.

             कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गट साधन केंद्राचे समन्वयक संजय कांबळे, विषय तज्ज्ञ बाबूराव इब्बितदार, संजय बोलेनवार, एस.एन. ब्राह्मण आदींसह सर्व विषय तज्ज्ञ , विषय शिक्षक व फिरते शिक्षक यांनी परिश्रम घेतले.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News