16 रोजी बुद्ध प्रभात कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचा सन्मान - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, May 11, 2022

16 रोजी बुद्ध प्रभात कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचा सन्मान

 


नांदेड : गेल्या तेरा वर्षापासून एकनिष्ठ प्रतिष्ठान तर्फे बुद्ध जयंती निमित्त बुद्ध प्रभात या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी सोमवार (ता.16) रोजी या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची दखल घेऊन एकनिष्ठ प्रतिष्ठान त्यांचा सन्मान करणार आहे. 

    एकनिष्ठ प्रतिष्ठान तर्फे गेल्या 13 वर्षापासून नांदेड शहरातील परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्ताने बुद्ध प्रभात या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आज पर्यंत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे तर प्रशासनातील अधिकारी वर्गानाही या कार्यक्रमास भेटी दिल्या आहेत. पहाटे सहा वाजता कार्यक्रमाची सुरुवात होत असते. या कार्यक्रमात नांदेड शहरातील हजारो बौद्ध अनुयायी  हजेरी लावतात . 

     गेल्या तीन वर्षापासून नांदेड नव्हे तर जगाला कोरोना या विषाणूने ग्रासले होते या काळात होत्याचे नव्हते झाले. प्रशासनही जनतेच्या सेवेसाठी सज्ज होते. प्रत्येक जण आपला जीव मुठीत घेऊन काम करत होता. अशा परिस्थितीत नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी या काळात विश्वास निर्माण करून गांभीर्यपूर्वक कार्य केले व नांदेडकरांना सेवा दिली. या कामाची दखल घेऊन एकनिष्ठ प्रतिष्ठान त्यांना  कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करणार आहे.  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे, सामाजिक कार्यकर्ते दशरथ पाटील , रमेश गोडबोले, सुरेश हटकर, अशोक भोरगे, कामगार नेते गणेश शिंगे यांची उपस्थिती राहणार आहे. 

      या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे यांनी धुरा सांभाळली असून यावर्षी अंकुश चित्ते व त्यांचा संच आणि विजय निलंगेकर  यांची बुद्ध - भीम गीते सादर होणार आहेत. तरी या कार्यक्रमास बौद्ध अनुयायांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक निहाल निलंगेकर, संयोजन समितीचे अध्यक्ष संपादक श्याम कांबळे , पत्रकार कुवरचंद मांडले, दीपंकर बावस्कर, संपादक सुनील कांबळे, यशवंत थोरात , गंगाधर झिंजाडे, बुद्धभूषण रायबोले, अनिरुद्ध निखाते, सुशील हटकर, प्रसाद सूर्यवंशी, शुभम जेठे, ऋषिकेश निलंगेकर  यांनी केले आहे.



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News