*हक्कांसाठी दिव्यांगांचे पुणे येथे ता. १७ मे रोजी अर्ध नग्न बोंबाबोंब धरणे आंदोलन* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Thursday, May 12, 2022

*हक्कांसाठी दिव्यांगांचे पुणे येथे ता. १७ मे रोजी अर्ध नग्न बोंबाबोंब धरणे आंदोलन*
नांदेड : कुंभकर्णी झोपेत असलेल्या लोकप्रतिनिधी व प्रशासनाला जागे करण्यासाठी , त्यांचे दिव्यांगांच्या  प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी *दिव्यांग जनता दल सामाजिक संघटना व दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने चंपतराव डाकोरे पाटील  कुंचेलिकर, कुलकर्णी  काका, ज्ञानेश्वर नवले यांच्या नेतृत्वात कडक उन्हात  *दिव्यांग आयुक्त कार्यालय पुणे येथे  मंगळवार (ता . 17 मे 2022 ) रोजी सकाळी 11 ते 5 या वेळत अर्ध नग्न बो बोंबाबोम धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

       यापूर्वी अनेक जिल्यातील दिव्यांगाना त्यांचे हक्क मिळावे म्हणून दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हातील सर्व  तहसिलदार व गटविकास अधिकारी अधिकारी यांना प्रत्यक्ष दि,१५ फ्रेबु २२ ते ५ मार्च२२* पर्यंत शिष्टमंडळाने निवेदनावर चर्चा करून मुदत देऊन सुध्दा न्याय हक्क मिळालेच नाहीत . साधे  प्रश्नाचे उतर मिळाले नसल्यामुळे *दिव्यांग कक्ष जिल्हा परिषद नांदेड यांच्या कडे दि,११ मार्च २२ राजी रितसर निवेदन दिले. दिव्यांगाच्या प्रश्नाकडे लक्ष घालून नांदेड जिल्ह्यातील तहसिलदार,व गटविकास अधिकारी यांच्याकडून न्याय मिळवुन देण्यासाठी तक्रार लेखि निवेदन  देऊनही दिव्यांग कक्ष यांनी सुध्दा साधे उतर प्रशासन कडून दिले नाही

      तेव्हा कडक उन्हात ता. २९ मार्च २२ रोजी जिल्हाधिकारी  कार्यालय नांदेड येथे चारशे दिव्यांग बांधवानी धरणे आंदोलन व समविचारी संघटनेने ३० मार्चला एल्गार मोर्चा काढुन सुध्दा न्याय हक्क मिळाला नाही. म्हणुन ता. ६,७ एप्रील २२ रोजी जिल्हा परिषद  कार्यालय नांदेड येथे  आमरण उपोषण करून ही न्याय मिळाला नाही.

        म्हणून कुंभकर्णी झोपेत असलेल्या लोकप्रतिनिधी, प्रशासनाला जागे करण्यासाठी व प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी दिव्यांग जनता दल सामाजिक संघटना व दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलिकर, कुलकर्णी  काका, ज्ञानेश्वर नवले*, यांच्या नेतृत्वाखाली  कडक उन्हात *दिव्यांग आयुक्त कार्यालय पुणे येथे ता.  17 मे 2022 रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत पर् अर्ध नग्न बोंबमारो धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन  मुख्यमंत्री व संबधित मंत्रीमहोदय यांना  दिव्यांग आयुक्त  पुणे यांच्या मार्फत दिले आहे . त्यात खालील मागण्यांचा समावेश आहे.


*दिव्यांग बांधवांच्या खालील मागण्या*


1)  दिव्यांग बांधवांना सर्व सामान्य जनतेसारखे जीवन जगता यावे म्हणून त्यांना त्यांचे हक्क व अधिकार मिळावा म्हणून दिव्यांग हक्क 2016 च्या कायद्याची अंमलबजावणी करून शासन अनेक निर्णय काढुन प्रशासकिय स्तरांवर  अंमल  बजावणी व्हावी म्हणून  ग्रामपंचायत स्तरावर दिव्यांगाच्या ग्रामसभा घेऊन कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश पारित करावे


२) दिव्यांगाना सर्व सामान्य जनतेसारखे जीवन जगता यावे व  स्वबळावर व्यवसाय करण्यासाठी,खासदार  आमदार दिव्यांग निधी दर वर्षी पंधरा लाख रुपये त्यांच्या मतदार संघात दिला तर त्यांना रस्त्यावर भिक मागण्याची वेळ येणार नाही   

३) दिव्यांग, वृध्द निराधार याना अनेक योजनेचे तहसील मार्फत मिळणारे अनुदानात दोन्ही वेळा चहा साठी दुध मिळत नाही तर ते एक हजार मानधनात महिनाभर कसे जीवन जगत असतील याचा विचार करुन किमान जीवन जगण्यासाठी  मानधनात दर महा पाच हजार रुपये वाढ करून ते वेळेवर दरमहा देण्यात यावे


 4) अंत्योदय राशन योजनेत दिव्यांग व्यक्तीला स्वतंत्र अंत्योदय  राशन व राशन कार्ड देण्याची शासन तरतूद करुन प्रशासकिय स्तरावर अंमलबजावणी  तहसिलमार्फत करण्याचे आदेश 

देण्यात यावे


५) दिव्यांगाना स्थानिक स्वराज्य कमिटीत सदस्य म्हणून निवड करण्यात यावे  ऊदा संजय गांधी निराधार योजना ईत्यादी निवड करावी

  ४) दिव्यांग बांधवाना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका, महानगर पालिका पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये दिव्यांगाचा पाच टक्के निधी दरवर्षी का देण्यात येत नाही न देणार्‍या अधिकारी यांच्या वर कडक कारवाई करावी


5) म. ग्रा.रो.ह.योजनेत दिव्यांगाला काम मिळेना


6) दिव्यांगाला स्वयंरोज गारासाठी जागा

गावातील शासकिय व निमशासकीय कार्यालयात व कार्यालयीन परिसरात दिव्यांगाला स्वयं रोजगारासाठी 200 स्केअर फुट जागा देण्याबाबत शासन निर्णय व परिपत्रक काढण्यात आले आहे. 


7) दिव्यांग बांधवांना घरकुल योजनेत प्राधान्य म्हणून  पाच टक्के प्रमाणे घरकुल देण्यासाठी शासन आदेशाची अंमलबजावणी केली जात नाही

८) प्रत्येक जिल्ह्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देऊन शासन प्रशासन यांची फसवणूक करणाऱ्या अधिकारी व संबधितावर कार्यवाही करावी खऱ्या दिव्यांगाना न्याय. मिळत नाही

       दिव्यांग आयुक्त यांनी आमचे प्रश्न मंञीमहोदय यांच्या कडे मांडावे ,

 आपल्या कनिष्ठ अधिकारी यांना दिव्यांग कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आदेशित करून न्याय हक्क घेण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल, ज्ञानेश्वर नवले, नागोराव बंडे पाटिल, राजुभाऊ  शेरकुरवर,रंजीत पाटिल,मगदुम शेख,प्रमसिंग चंव्हाण, विठ्ठलराव बेलकर, बालाजी होनपारखे, गजानन वंहिदे,चांदू गवाले, चंद्रकांत जाधव,राहुल सोनूले, दिंगाबर लोणे,हानिफ शेख,संजय राठोड,भारतीताई जानगेनवाड, सुभद्राबाई शिंदे , यशोदाबाई  फैरमारे,कालिंदा मोरे, सविता नांवदे, बालाजी भेंडेकर,बालाजी गवाले, हेंमत पाटिल, हरिश्र्चंद्र पोले, गोपाळ अडबलवार,अनिल रामशेटवार आदिंनी केले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News