*जनराज्य आघाडीच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव लंगडापुरे यांची एकमताने निवड* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, May 12, 2022

*जनराज्य आघाडीच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव लंगडापुरे यांची एकमताने निवड*




नांदेड : येथील निर्मल होस्टेलमध्ये राजकीय व सामाजिक चळवळीत गेल्या पंचवीस वर्षापासून निष्ठेने काम करणारी समविचारी मित्रमंडळी एकत्र येऊन विचारमंथन करून स्थापलेल्या जनराज्य आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव लंगडापुरे यांची निवड केल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

           चंपतराव डाकोरे पाटिल यांनी या बैठकीचं अध्यक्ष स्थान भूषविलं होतं. यावेळी निवडलेली कार्यकारिणी पुढील प्रमाणे : जिल्हा उपाध्यक्ष राम पाटील मंडलापुरकर, जिल्हा महासचिव डाॅ.राजेश्वर पालमकर, कार्यकारी सचिव अशोक घायाळे, सचिव पी. डी. वासमवाड, सह सचिव मनोहर पाटील रातोळीकर, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटील , जिल्हा युवा अध्यक्ष ज्ञानेश्वर पोटफोडे , सदस्य : गुंडाळी बोयाळे, गोविंदराव चातगिळे , अर्धापुर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर नवले.

       अशोक घायाळे यांनी प्रास्ताविक व ज्ञानेश्वर पोटफोडे यांनी सुत्रसंचालन केले.

 गुंडाजी बोयाळे यांनी आभार मानले. याप्रसंगी नवनियुक्त कार्यकारिणीचा

सत्कार करुन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. अनेक मान्यवरांनी जनराज्य संघटनेत सहभागी  होण्याचे अवाहन केले.

   


     या  बैठकिस बाबुराव लंगडापूरे, सर्जेराव देशमुख, राजेश्वर पालमकर, राम पाटील मंडलापुरकर, पी. डी . वासमवाड , येरनाळेताई मरखेलकर, नागोराव बंडे पाटिल, चंपतराव डाकोरे पाटिल,अशोक घायाळे ,  बाबाराव पाटील लाडेकर, बालाजी पाटील बोरगावकर, एम. टी. पाटिल , दिलीप पाटील, वसंत पाटील  कुडनेते,  गुलाब पाटील मडावी, आदी मान्यवर उपस्थित होते. असे जिल्हा प्रसिद्धि प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल यांनी कळविले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News