*मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी समर्पित आयोग निवेदने स्विकारण्यासाठी विभागीय दौऱ्यावर* ▪️रविवार 22 मे रोजी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाला भेट - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Friday, May 13, 2022

*मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी समर्पित आयोग निवेदने स्विकारण्यासाठी विभागीय दौऱ्यावर* ▪️रविवार 22 मे रोजी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाला भेट 

नांदेड (जिमाका) ता. 13 : महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि शहरातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थेत नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी, व्हीजेएनटी) आरक्षण देण्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयाने  दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग गठीत केला आहे. नागरिकांचे मते जाणून घेण्यासाठी समर्पित आयोगाचे सदस्य हे 21 ते 28 मे 2022 या कालावधीत विभागवार भेटी देणार आहेत. यासाठी समर्पित आयोगाने विभागनिहाय भेटीचा कार्यक्रम निश्तिच केला आहे.

 

राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्विकारण्यासाठी समर्पित आयोगाने विभागवार हा कार्यक्रम जाहिर केला आहे.

 

या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी नागरिकांना स्वत:ची मते वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावेत यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी असे आयोगातर्फे कळविण्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क करावा, असेही स्पष्ट केले आहे.    

 

*समर्पित आयोगाचा दौरा व भेटीच्या वेळा  *  

 

शनिवार 21 मे 2022 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे सकाळी 9.30 ते 11.30 या कालावधीत. रविवार 22 मे 2022 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे सकाळी 9.30 ते 11.30 यावेळेत तर याच दिवशी 22 मे रोजी सायं. 5.30 ते 7.30 यावेळेत विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे. बुधवार 25 मे 2022 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय कोकण भवन येथे. दुपारी 2.30 ते 4.30 या कालावधीत. शनिवार 28 मे 2022 रोजी सकाळी 9.30 ते 11.30 या कालावधीत  विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे तर शनिवार 28 मे 2022 रोजी सायं. 4.30 ते 6.30 या कालावधीत विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे समर्पित आयोगाचे सदस्य भेट देणार आहेत संबंधितानी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन आयोगाच्यावतीने करण्यात आले आहे.  

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News