शिक्षक भास्कर काळे यांचे निधन ता. 14 रोजी सकाळी 10.30 वाजता किनवटमध्ये अंत्यसंस्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, May 13, 2022

शिक्षक भास्कर काळे यांचे निधन ता. 14 रोजी सकाळी 10.30 वाजता किनवटमध्ये अंत्यसंस्कार



किनवट : राजेंद्र नगरमधील रहिवाशी तथा प्रधानसांगवी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेंदितांडा येथील पदवीधर शिक्षक भास्कर अंबादासराव काळे (वय 51 वर्षे) यांचे शुक्रवार (ता.13) रोजी दुपारी 4.00 वाजता  निधन झाले. मागील तीन महिन्यापासून ते रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेत होते.

      ते अत्यंत शांत स्वभावाचे होते. स्मार्ट-पीटी प्रशिक्षणात त्यांनी साधन व्यक्ती म्हणून काम पाहिले. नयाकॅम्प किनवट केंद्रांतर्गत त्यांची बहुतांश सेवा झाली होती. किनवट येथील स्मशानभूमीत शनिवार (ता.14) रोजी सकाळी 10.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पश्चात  मुलगा, मुलगी, सून, जावई असून बेंदी तांडा येथील शिक्षिका मिनाताई नरपडवार यांचे ते पती होत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News