डॉक्टर्स असोसिएशन किनवटने महाराष्ट्र डॉक्टर्स नोंदणी प्राधिकरणाला 'त्या ' अत्याचारी घटनेची अद्यापपर्यंत माहिती कळवली नाही - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Friday, May 13, 2022

डॉक्टर्स असोसिएशन किनवटने महाराष्ट्र डॉक्टर्स नोंदणी प्राधिकरणाला 'त्या ' अत्याचारी घटनेची अद्यापपर्यंत माहिती कळवली नाही

 किनवट :  शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. त्यासंदर्भात किनवट पोलीस ठाणे येथे गुन्हाही दाखल झाला. सदर घटनेचे वृत्त विविध माध्यमातून आले.  परंतु डॉक्टर्स असोसिएशनने या घटनेबद्दल तोंडही उघडतले नव्हते. त्यामुळे त्यांचे नावे ओरड होऊ लागली होती. 

        या बाबीची दखल घेऊन डॉक्टर्स असोसिएशन किनवटने शुक्रवार (ता. 13 मे 2022 ) रोजी साने गुरुजी रुग्णालय येथे पत्रकार परिषद घेतली.  डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. पत्की यांनी सदर पत्रकार परिषदेमध्ये या आमानवी घटनेच्या संदर्भात  ज्या ज्या डॉक्टरांनी त्या पीडित मुलीवर डॉक्टर म्हणून उपचार केला त्या डॉक्टरांकडे आरोपी म्हणून पाहण्यात येऊ नये , असे सांगितले. तसेच त्या मुलीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी डॉक्टर या नात्याने उपचार केला व त्या मुलीचा जीव वाचवला म्हणून त्या कोणत्याही डॉक्टरांना आरोपींच्या नजरेतून पाहण्यात येऊ नये किंबहुना त्यांच्यावर कोणते प्रकारचे आरोप करण्यात येऊ नये, जर असे झाले तर  भविष्यात कोणताही डॉक्टर उपचार करण्यास धजावेल का ?असा प्रश्नही त्यांनी विचारला.

     सध्या स्थितीत किनवटमध्ये मेडिकल प्रॅक्टिससाठी चांगली परिस्थिती निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे. असेही सांगण्यात आले.  यापुढे डॉक्टर्स असोसिएशन किनवट काय करणार आहे ?असा प्रश्न पटकरांनी विचारला असता डॉक्टर्स असोसिएशन किनवट हे या अमानवीय घटनेचा निषेध करते.  असे सांगण्यात आले.  कोणत्याही गुन्हेगाराला संघटना पाठीशी घालणार नाही असे सुद्धा सांगण्यात आले.  याच प्रश्नाला अनुसरून असा प्रश्न विचारला की , महाराष्ट्र डॉक्टर्स नोंदणी प्राधिकरणाला तुमच्या संघटनेमार्फत ही अमानवी अत्याचाराची घटना कळविण्यात आली का ? असा प्रश्न विचारला असता या घटनेची माहिती अद्यापपर्यंत आमच्या संघटनेमार्फत फक्त प्रशासनाला ही माहिती कळविण्यात आली आहे परंतु महाराष्ट्र डॉक्टर्स नोंदणी प्राधिकरणाला ही माहिती आम्ही कळवली नाही. आमच्या वरिष्ठांना याबद्दल विचारून माहिती घेऊन ही माहिती आम्ही निश्चितच कळवेन असे आश्वासन देण्यात आले. 

        अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराला कुणीही पाठीशी घालू शकत नाही. हे जरी सत्य असले तरी महाराष्ट्र डॉक्टर्स नोंदणी प्राधिकरणाला अद्यापपर्यंत कोणत्याही सुजाण नागरिकाकडून अथवा कोणत्याही संघटनेकडून अथवा डॉक्टर्स असोसिएशन कडून अद्याप पर्यंत ही माहिती गेलेली नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. हे असे होत नाही म्हणूनच भविष्यात अशा अमानवी घटना घडत असतात. हे आपणास या ठिकाणी विचारात घ्यावेच लागेल. पीडित मुलीला न्याय मिळेलच यात तिळमात्र शंका नाही . 

       यावेळी डॉक्टर्स असोसिएशन , किनवटने प्रसिद्धी साठी दिलेली प्रेसनोट पुढील प्रमाणे दिली आहे.

प्रेस नोट 

डॉ . सुंकरवार यांचेकडे काम करणाऱ्या अल्पवयीन मुलींवर घडलेल्या घृणास्पद , अमानविय , निंदनीय कृत्याचा आम्ही डॉक्टर्स असोसिएशन किनवट तर्फे तिव्र शब्दात ' निषेध व्यक्त करतो . शनिवारी सांयकाळी गुन्हा दाखल झालेल्या या घटनेचा आम्ही असोसिएशनने मंगळवारी प्रशासनाकडे निषेध व्यक्त केला . काही पत्रकार बांधवांचे आलेल्या फोनवर  डॉक्टर्स असोसिएशन तर्फे निषेध नोंदवला व आमचे ज्येष्ठ सहकारी डॉ . बेलखोडे यांनी दुसऱ्याच दिवशी निषेध नोंदवला व त्याची वर्तमान पत्रांनी नोंद घेतली. 

        आय . एम . ए . निष्क्रीय राहिली व विलंब केला , असा गैरसमज प्रशासनाचा झाला असुन हा विलंब डॉ . असोसिएशनचा होता . आय . एम . ए . ची किनवट मध्ये सुरुवात झाली नाही  व येथील डॉक्टर्स आय . एम . ए . नांदेड अंतर्गत काम करतात . डॉक्टर्स असोसिएशन , किनवट हे आय . एम.ए. , निमा , हिमा व आय.डी.ए. यांचे संयुक्त संघटन आहे . 

           झालेल्या घटनेचा तपशिल असा आहे .  पिडीता व तिची आई गुरुवारी दुपारी त्यांचे फॅमिली डॉक्टर सुर्यवंशी कडे पोट दुखत आहे म्हणुन गेले . तपासणीत मुलीला पाळीच सुरू झाली नाही , असे आईने सांगीतले व त्यामुळे पोटदुखी हि पोटातील गोळ्यामुळे असेल असे प्राथमिक निदान करून तिला सोनाग्राफी साठी पाठविले . सध्या वडील सोबत नसल्याने आईने उद्या सोनोग्राफी करतो , सध्या गोळ्या द्या असे विनवले . डॉक्टरांनी ऍसिडीटी व पोटदुखीच्या गोळ्या दिल्या . 

       पिडीता शुक्रवारी वडीलांसोबत सोनोग्राफी साठी डॉक्टर तोंडारे यांचेकडे गेली असता , त्यांनी विचारलेल्या प्रश्नातुन ती गरोदर असल्याची शक्यता त्यांना वाटली .  यासाठी  रेफरल लेटर आणण्यास सांगीतले . वडील यासाठी डॉ . सुर्यवंशी कडे आले , तेंव्हा त्यांनी स्त्री - रोग तज्ञाकडे जाण्याचा सल्ला दिला .  पिडीता पालकांसोबत डॉ . बेलखोडे यांच्याकडे शुक्रवारी दुपारी गेली व आईने ती गरोदर असल्याची सांगीतले , पण पाळी सुरू न होता , गर्भधारणा कशी होते ? असे तिने डॉक्टरांना विचारले . तुम्ही मोठे डॉक्टर आहात , तपासुन सांगा . चार दिवसांपासुन पोट दुखत आहे , दोन दिवसांपासून जास्त दुखत आहे , आता तर खुपच दुखत आहे असे सांगीतले . प्राथमिक तपासणीत बाळाचे ठोके ऐकु येत होते , करीता सोनोग्राफी करणे अत्यावश्यक वाटल्याने रेफरल पत्र देऊन डॉक्टर तोंडारे यांच्याकडे पाठविले  व ती गेली सुध्दा . पोटात आताही खुप दुखत असल्याने जातांना तिला वेदनाशामक इंजेक्शन पायरॉक्स दिले . 

      परिस्थितीचे गांभीर्य जाणुन सदर बाब डॉ . बेलखोडे यांनी सहायक जिल्हाधिकारी यांच्या कानावर घातली , तेंव्हा ते नांदेडला होते . महिला बालविकास अधिकाऱ्यामार्फत संबंधीत मुलगी व आई -वडीलांचे काउन्सलींग करुया , असे ते म्हणाले .  थोड्या वेळाने डॉ . तोंडारे यांच्याकडून फोन आला  व गर्भ ६ महिने ५ दिवसाचा होता असे कळविले . तिला पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय , गोकुंदा येथे पाठवावे व रितसर पोलीसांना कळवावे , असे त्यांचे बोलणे झाले . पण दहा मिनीटानंतर डॉ . तोंडारे यांचा पुन्हा डॉ . बेलखोडे यांना फोन आला व सदर मुलीचे त्या सोनोग्राफी सेंटरच्या बाथरूम मध्ये बाळंतपण सुरू झाले आहे. आपण ताबडतोब मदतीला यावे , असे डॉ . तोंडारे म्हणाले .  अगदी ४ - ५ मिनीटातच डॉ . बेलखोडे तेथे पोहचले , तेंव्हा बाळंतपण अर्धे झाले होते व बाळ बाहेर आले होते व आईने ते धरले होते . डॉ . बेलखोडे यांनी ते पुर्ण करून मुलीची सुटका केली .  रक्तस्त्राव जास्त होऊ नये , म्हणुन इंजेक्शन मिथार्जीन दिले .  त्याच वेळी डॉ . तेलंगही पोहचले होते . 

       मुलीला नंतर रितसर पत्र देऊन डॉ . तोंडारे यांनी उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे पाठविले. पत्र घेऊन पोलीसांना कळविण्यास गेले . तसेच डॉ . बेलखोडे यांनी अशा प्रकारे डिलेवरी झाल्याची नोट सहायक जिल्हाधिकारी यांना व्हाट्सऍप वर पाठविले .  सर्व प्रक्रिया होईपर्यंत पिडीतेच्या गरोदर पणाची पार्श्वभुमी कोणालाही माहिती नव्हती , याचा संबंध डॉ . सुंकरवार यांच्याशी आहे , याची डॉक्टरांना तरी कल्पना कशी असणार ? पण या प्रक्रियेतील डॉक्टर हे , डॉक्टर सुंकरवार यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात हा आरोप होत आहे , जो निराधार व तथ्यहिन आहे . या उलट डॉक्टरांनी रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी जे करायला पाहिजे तेच केले. रितसर प्रशासनाला कळविले सुध्दा . सदरील प्रकरणात डॉक्टरांनी योग्य ती वैद्यकिय पाऊले उचलली म्हणुन रुग्णांचा जीव वाचला , व योग्य ती कायदेशीर पाऊले उचलली म्हणुन प्रकरण उघडकीस आले .     

        सदरील प्रक्रियेत कुठल्याही डॉक्टरने गर्भपाताची गोळी किंवा इंजेक्शन दिले नाही . परंतू किनवटमध्ये अनेक ठिकाणी अशा गोळ्या मिळतात. बोगस बंगाली डॉक्टरांकडून ते दिल्या जातात . तरीही प्रशासनाने या करीता रुग्णाच्या नातेवाईकांनी गर्भपातासाठी कुठून गोळ्या घेतल्या तर नाही ना ? याचा शोध घ्यावा .  सर्व प्रयत्न करुन रुग्णाचा जीव वाचविला तरीही डॉक्टरांवर आरोप होत असतील तर भविष्यात रुग्णाचा जीव वाचविण्यास डॉक्टर धजावतील का ? याचा सर्वांनी विचार करावा, ही विनंती . 

डॉक्टर्स असोसिएशन , किनवट

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News