पूर्व शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे एमएला प्रथम श्रेणीत विद्यापीठात सर्वप्रथम - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Saturday, May 14, 2022

पूर्व शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे एमएला प्रथम श्रेणीत विद्यापीठात सर्वप्रथम

 


नांदेड : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने जून 2021 मध्ये घेतलेल्या एमए परीक्षेत पूर्व शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांनी प्रथम श्रेणीत विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा सन्मान प्राप्त केला आहे. डॉ. नांदेडे यांनी महिला सक्षमीकरण या विषयात ही एमएची पदवी प्राप्त केली आहे. ही त्यांची एमएची विसावी पदवी असून एकुणातील तिसावी पदवी आहे.

        डॉ. नांदेडे राज्याचे सेवानिवृत्त शिक्षण संचालक असून त्यापूर्वी त्यांनी नांदेड जिल्हा परिषदेत कलंबर (खुर्द) येथे बारा वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून काम केलेले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे श्रद्धास्थान असून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन गेली  सत्तेचाळीस वर्षे ते ज्ञानाची अखंड साधना करीत आहेत. अहर्निश परिश्रम करून  राज्यातील जवळजवळ सर्व विद्यापीठांतून वेगवेगळ्या विषयात त्यांनी ह्या पदव्या घेतल्या आहेत. मराठी नेट आणि शिक्षणशास्त्र सेट यासह दोन विषयात (मराठी आणि शिक्षणशास्त्र) पीएचडी प्राप्त केली आहे. पाच ते सहा पुस्तकांचे लेखक असलेले नांदेडे खेडे, पाडे, वाडी, तांडे आणि ग्रामीण भागातील गोरगरीब वंचित पालकांच्या आणि शेतकऱ्यांच्या मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे आणि ते अधिकारी व्हावेत या ध्यासाने ते खेड्यापाड्यातून अहर्निश फिरत असतात.

        राज्याचे शिक्षण संचालक असताना डॉ. नांदेडे यांनी प्रधान सचिव  नंदकुमार यांच्या सहयोगाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त आठरा तास सलग अभ्यास, शाळाबाह्य विद्यार्थी मुक्त महाराष्ट्र आणि ज्ञानरचनावादी अध्ययन अध्यापन यासारखे अनेक उपक्रम यशस्वीरीत्या कार्यान्वित केले होते. राज्याचे राज्याचे पूर्व शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके, माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर आणि प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर,  पूर्व सनदी अधिकारी अनिल मोरे, पूर्व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे, साहित्यिक व्यंकटेश चौधरी यांच्यासह अनेकांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News