'त्या' विकृतावर गर्भपाताचाही गुन्हा दाखल करावा ; धमकी देऊन इतरांवर अत्याचार केला काय ? याचा तपास करावा : महाराष्ट्र नाभिक महामंडळाची मागणी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, May 13, 2022

'त्या' विकृतावर गर्भपाताचाही गुन्हा दाखल करावा ; धमकी देऊन इतरांवर अत्याचार केला काय ? याचा तपास करावा : महाराष्ट्र नाभिक महामंडळाची मागणी




 किनवट : 'त्या' पिडितेचा गर्भपात झाला त्यामुळे गर्भपाताचाही गुन्हा तात्काळ दाखल करावा तसेच विकृत मनोवृत्तीचा आरोपी डॉ. विकास सुंकरवार याने याच प्रकारे धमकी देवून इतरांवर अत्याचार केल्याची चर्चा आहे तेव्हा त्या दिशेनेही निपक्ष : तपास व्हावा अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा  महाराष्ट्र नाभिक महामंडळ तालुका शाखा किनवटच्या वतीने जिल्हा पोलिस अधिकांना निवेदनाद्वारे दिला आहे.

       निवेदनात पुढे असे नमूद केले की, क्लिनिक मध्ये साफसफाईचे काम करणत्या येथील अल्पवयीन मुलीस व तिच्या कुंटूंबास जीवे मारण्याची धमकी देवून डॉ. विकास सुंकरवार याने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे . परंतु सदरील प्रकरणात पिडितेचा गर्भपात झालेला असून सुध्दा अजूनपर्यंत गर्भपाताचा गुन्हा दाखल झालेला नाही . गर्भपाताचा गुन्हा घडला पण गुन्हा दाखल नाही असे का ? गुन्हा घडल्यावर गुन्हा दाखल होणे अपेक्षीत आहे . त्यामुळे गर्भपाताचा गुन्हा तात्काळ दाखल करण्यात यावा . पुढे निवेदनात असे म्हटले की , आम्ही पिडीत अल्पवयीन मुलीच्या झालेल्या गर्भपाताच्या अंशाचे ( पिंडाचे ) न्यायालयीन अधिपत्याखाली निपक्ष : वैद्यकीय अहवालाची मागणी करतो . सदरील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेतल्यास मुलीवर व तिच्या कुंटूंबावर दबाव आणण्याचे प्रयत्न केले जाण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे आरोपीस न्यायालयीन अंतिम निकालापर्यंत जामीन देण्यात येवू नये . अशी विनंती आपणामार्फत न्यायालयात करण्यात यावी अशी मागणी आम्ही करतो . याच प्रकारे इतरही महिलांवर आरोपी मार्फत अत्याचार झाल्याचे ऐकू येत आहे या संबंधीसुध्दा चौकशी होणे गरजेचे आहे . तसेच सदरील प्रकरणात पिडीत व तिच्या कुंटूंबावर इतरामार्फत दबाव आणण्याचे प्रकार आमच्या निदर्शनात आल्यास तशी तक्रार आपल्याकडे आम्ही करू परंतु आमच्या तक्रारीची गांभीर्याने दखल न घेतल्यास महाराष्ट्र नाभिक महामंडळा मार्फत समस्त महाराष्ट्रात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात दिला आहे. 

          पवित्र वैद्यकीय क्षेत्रास काळीमा फासणाऱ्या नराधम , गुंड प्रवृत्तीच्या , बलात्कारी डॉ . विकास सुंकरवार हा “ सर्वोच्च शिक्षेस " पात्र आहे . तरी मे . साहेबांनी निपक्ष : तपास करण्याचे आदेश द्यावेत  व पिडीतेस , तिच्या कुटूंबास न्याय मिळवून देण्यास सहकार्य करावे . तसेच परिसरातील समस्त भयभीत माता , भगिनिंना अभय द्यावे . अशी  कळकळीची नम्र विनंती निवेदनाद्वारे केली आहे.    

         निवेदनावर  प्रांत कार्यकारणी सदस्य विजय श्रीराम पोलासवार ,  तालुकाध्यक्ष सिताराम राचटकर , प्रांत सल्लागार सुदाम सजणे ,  तालुका सचिव अशोक शेर्लावार,  तालुका संघटक लक्ष्मण लिंगमपल्ले, शहराध्यक्ष अमोल हळदकर,  तालुका सल्लागार भुमला भुमन्ना गुंजलवार ,  माजी शहराध्यक्ष नरसींग भगीरथीवार , युवा तालुका अध्यक्ष स्वप्नील राऊत राजगडकर , माजी तालुका सचिव माधव खेडकर  आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. 


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News