*अभियंता भरतकुमार कानिंदे यांना समाज भुषण पुरस्कार जाहीर* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, May 18, 2022

*अभियंता भरतकुमार कानिंदे यांना समाज भुषण पुरस्कार जाहीर*


किनवट (महेंद्र नरवाडे) : वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नांदेड येथे सत्यशोधक फाऊंडेशन व मानव विकास सेवाभावी संशोधन संस्थायांच्या वतीने  आयोजित  साहित्य संमेलनात अभियंता भरतकुमार कानिंदे यांना वामनदादा कर्डक जन्मशताब्दी समाजभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने सर्वत्र त्यांचा गौरव होत आहे. 

      शासकीय सेवा तत्परतेने व निष्ठेने बजावणारे अधिकारी  व आंबेडकरी आंदोलनातील सामाजिक, सांस्कृतिक व धम्मचळवळ गतिमान करण्यासाठी धडपणारे व समाजासाठी भरीव योगदान देणारे कृतिशील कार्यकर्ते  म्हणून त्यांची ओळख आहे. विद्यार्थी दशेत शासकीय वसतीगृहातील समस्या निवारणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टलर्स असोसिएशनची (बाहा ) त्यांनी स्थापना केली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागात रुजू झाल्यानंतर  बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअरिंग (बानाई) यामध्येही ते सक्रीय आहेत. असे अभियंता भारतकुमार खंडूजी कानिंदे यांना उल्लेखनिय कार्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. शनिवार (ता .  21 मे 2022 ) रोजी  सकाळी ठीक 11 वाजता  कुसुम सभागृह नांदेड येथे मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.   

          हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभि. भीमराव धनजकर, अभि. मधुकर एम.कांबळे, अभि. यशवंत गच्चे, अभि. वसंत वीर, अभि. मिलिंद गायकवाड, अभि. डी. डी. भालेराव, अभि. सम्राट हाटकर, एस. टी. पंडीत, रोहिदास कांबळे, बी. जी. पवार, टी. पी. वाघमारे, रेल्वे प्रबंधक देवीदास भिसे, अनिल आठवले, यांच्या सह डॉ. भीमराव कांबळे, रंगराव नरवाडे, दयानंद तारु, मिलिंद कदम, महेंद्र नरवाडे, उत्तम कानिंदे, इकबाल शेख, उत्तम नरवाडे, प्रताप कऱ्हाळे, श्रीपाद पांडवे, डॉ. नागोराव लोणे, प्रा. डॉ. अशोक कंधारे, रमेश हटकर, मधुकर गिरगावकर, प्रा. डॉ. डी. एन. गोखले, अशोक कोल्हे आदिंनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News