मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विद्यार्थी जीवनात अध्ययन - अध्यापन बरोबरच सहशालेय कृतीला विशेष महत्व प्राप्त होत असते. स्वयंम् शिस्त, स्वावलंबन, व आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी राज्यातील अनेक शाळांमध्ये महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् चे वर्ग घेतले जातात. या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाते व अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत.
मुंबईतील अंधेरी येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल या शाळेचे शिक्षक श्री. जितेंद्र महाजन सरांची उत्तर मुंबई उपनगर जिल्हासाठी सहाय्यक जिल्हा आयुक्त (स्काऊट) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. स्काऊट चळवळीच्या संख्यात्मक व गुणात्मक वाढीसाठी महाजन सर नेहमीच अग्रेसर असतात. कोव्हीड काळात विद्यार्थ्यांंचे लसीकरण, गणेशोत्सव विसर्जन काळात वाहतूक व्यवस्थेला मदत करणे, निवडणूक काळात मतदार व विशेषतः वृध्द, अपंग मतदारांना मदत करणे, तरुणांना मतदान हक्क बजावण्यासाठी जागृत करणे, आरोग्य विषयक शिबीर आयोजित करणे, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम अशा अनेक सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असलेल्या जितेंद्र महाजन सरांची सहायक जिल्हा आयुक्तपदी निवड झाल्याबद्दल समाजातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
शिक्षक हा सुद्धा एक विद्यार्थी असतो. विद्यार्थ्यांना शिकवता, शिकवता शिक्षकही बरेच काही शिकत असतो. स्काऊटस् व गाईड ही राज्यातील फार मोठी विद्यार्थ्यांना घडवणारी चळवळ आहे. मी माझ्यापरीने माझ्या अधिकारात चांगले व सृजान नागरिक घडवण्याचे प्रयत्न करीन असे मनोगत महाजन सरांनी आमच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केले.
No comments:
Post a Comment