शिक्षण विभागातील 29 बदल्या : प्रशासकीय 10 तर विनंती 19 बदल्यांचा समावेश #किनवट तालुक्यातील रिक्त पदे भरली - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, May 25, 2022

शिक्षण विभागातील 29 बदल्या : प्रशासकीय 10 तर विनंती 19 बदल्यांचा समावेश #किनवट तालुक्यातील रिक्त पदे भरली

 



नांदेड : नांदेड जिल्‍हा परिषदे अंतर्गत कार्यरत विविध संवर्गातील कर्मचा-यांच्‍या सार्वत्रिक बदली प्रक्रिया समुपदेशनाव्‍दारे जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू आहेत.

     मंगळवार (ता. 24 मे ) रोजी बदली प्रक्रियाच्या चौथ्या दिवशी शिक्षण विभागाच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पेसा अंतर्गत किनवट तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांची पदे भरली आहेत. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी रिक्तपद सुद्धा भरले आहे. अनेक वर्षापासून रिक्त असलेल्या गणित विषय शिक्षकांची पदे व अन्य पदे भरल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर व  प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांना किनवट तालुक्यातील शिक्षणप्रेमी नागरिकांनी धन्यवाद दिले आहेत. अशी माहिती गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी दिली.

         अराजपत्रीत मुख्याध्यापक पदाची  प्रशासकीय कारणावरून 1  बदली झाली. केंद्र प्रमुख पदाच्या प्रशासकीय 2 बदल्या झाल्या. शिक्षण विस्तार अधिकारी पदाच्या 8 बदल्या करण्यात आल्या. यात प्रशासकीय 2 तर विनंतीने 6 बदल्या करण्यात आल्या. माध्यमिक शिक्षकांच्या 18 बदल्या करण्यात आल्या. यात प्रशासकीय 5 तर विनंतीवरुन 13 बदल्यांचा समावेश आहे. 


      बदली प्रक्रियेत यावेळी जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे, सामान्‍य प्रशासन विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे,  ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेव केंद्रे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, उप शिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, सर्व गट शिक्षणाधिकारी यांची उपस्थिती होती.

   आज बुधवार (ता. 25  मे ) रोजी ग्राम पंचायत विभातील कर्मचा-यांच्‍या सकाळी 10  पासून बदली प्रक्रियेला सुरवात होणार आहे. 

      शासन निर्णयाच्‍या निकषानुसार समुपदेशाने बदली प्रक्रिया पार पाडल्‍या जात आहेत. जिल्‍हयातील सर्व तालुक्‍यात असणा-या जागांच्‍या समानिकरणानुसार पारदर्शक बदल्‍या करण्‍यात येत आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News