*पशुसंवर्धन विभागाच्या 19 तर अर्थ विभागाच्या 14 बदल्या* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, May 26, 2022

*पशुसंवर्धन विभागाच्या 19 तर अर्थ विभागाच्या 14 बदल्या*


नांदेड, ता. 26: जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक बदली प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी आज गुरुवार दिनांक 26 मे रोजी पशुसंवर्धन व अर्थ विभागातील कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाव्‍दारे जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाल्या. 

     पशुसंवर्धन विभागातील 19 तर अर्थ विभागातील 14 अशा एकूण 33 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात पशुसंवर्धन विभागातील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पदाच्या 2 बदल्या झाल्या. यात प्रशासकीय एक तर विनंतीने एक बदलीचा समावेश आहे. पशुधन पर्यवेक्षक  पदाच्या प्रशासकीय 8 तर विनंतीने 9 अशा एकूण 19 बदल्या करण्‍यात आल्‍या आहेत. 

      दुपारच्या सत्रात अर्थ विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रिया पार पडल्या. यामध्‍ये सहाय्यक लेखा अधिकारी पदाच्‍या 4 बदल्‍या करण्‍यात आल्‍या. यात प्रशासकीय 2 तर विनंती 2 बदल्‍यांचा समावेश आहे. कनिष्‍ठ लेखा अधिकारी पदाची विनंतीने एक बदली करण्‍यात आली. वरिष्‍ठ सहाय्यक लेखा या संवर्गातील 5 बदल्‍या झाल्‍या. यात प्रशासकीय 1 तर विनंतीने 4 बदल्‍या करण्‍यात आल्‍या. कनिष्‍ठ सहाय्यक लेखा पदाच्‍या 4 बदल्‍या करण्‍यात आल्‍या असून यात प्रशासकीय 3 त‍र विनंतीने एक बदली झाली आहे.

     बदली प्रक्रियेत यावेळी जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. संतोष तुबाकले, सामान्‍य प्रशासन विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी शिवप्रकाश चन्‍ना, ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेव केंद्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भुपेंद्र बोधनकर, डॉ. अरविंद गायकवाड आदींची उपस्थिती होती.


      शासन निर्णयाच्‍या निकषानुसार समुपदेशाने बदली प्रक्रिया पार पाडल्‍या. जिल्‍हयातील सर्व तालुक्‍यात असणा-या जागांच्‍या समानिकरणानुसार पारदर्शक बदल्‍या झाल्याबद्दल सर्व विभाबातील कर्मचारी, विविध संघटनांनी आनंद व्यक्त करुन प्रशासनाचे आभार मानले आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News