शैक्षणिक वर्षाचा आजपासून प्रारंभ - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, June 13, 2022

शैक्षणिक वर्षाचा आजपासून प्रारंभ

 



मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : ता.13 जुन शाळेचा पहिला दिवस. आज विजय भेटेल, प्रकाश भेटेल, आरती भेटेल, जितेन भेटेल, हितेन भेटेल. सर्व मित्र, मैत्रिणी भेटतील. शाळेच्या पहिल्या दिवसाचा उत्साह हा प्रत्येकालाच असतो.

           कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण पध्दती विकसित झाली व नवसंकल्पना व नव्या पध्दतीने अध्ययन -अध्यापन प्रक्रिया सुरू झाली. दोन वर्षांपूर्वी कोविड मुळे वेळेवर सुरू न झालेल्या राज्यातील शाळा आजपासून सुरू झाल्या. मोठ्या उत्साहाने व नवनिर्मितीच्या प्रेरणेने आज शिक्षक शाळेत दाखल झाले. शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी यावर्षी 13 जुनला शिक्षकांसाठी प्रथम शाळा सुरु केली व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 15 जुन हा शाळेचा पहिला दिवस असेल अशी घोषणा केली. 

       विद्यार्थी शाळेत येण्यापुर्वी वार्षिक नियोजन, शाळेची स्वच्छता,सॅनिटायजेशन, अध्ययन व अध्यापन प्रक्रिया व वर्ष भरातील परीक्षा, सातत्यपूर्ण मुल्यमापनाचे कार्य या सर्व गोष्टींचा विचार करण्यासाठी या दोन दिवसाचा उपयोग करण्यात येईल. कोव्हीड 19 आरोग्य विषयक सुचनांचे पालन करुन 15 जुनला शाळेतील विद्यार्थ्यांची शाळा नियमितपणे सुरू होईल.

विद्यार्थ्यांचे स्वागत करुन शाळेत पहिला दिवस आपआपल्या परीने शैक्षणिक वर्ष साजरा करण्यात येईल व खऱ्या अर्थाने नव्या शैक्षणिक वर्षाला सुरूवात होईल. शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना नव्या शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News