*वड लागवडीचा वनडे उपक्रम; एकाचवेळी जिल्ह्यात सुमारे 9 हजार वृक्षांची लागवड* *सीईओ वर्षा ठाकूर-घुगे यांचा नाविन्‍यपूर्ण उपक्रम* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, June 13, 2022

*वड लागवडीचा वनडे उपक्रम; एकाचवेळी जिल्ह्यात सुमारे 9 हजार वृक्षांची लागवड* *सीईओ वर्षा ठाकूर-घुगे यांचा नाविन्‍यपूर्ण उपक्रम*


नांदेड, ता.13 : वटपौर्णिमेनिमित्त मंगळवार तारीख 14 जून रोजी जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व ग्रामपंचायत परिसरात सुमारे 9 हजार 176 वडवृक्ष लागवड करण्यात येणार आहे, अशी माहिती नादेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.

      जिल्हा परिषदे अंतर्गत जिल्ह्यात एकाच वेळी लावण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडी मध्ये जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील 3 हजार 739 शाळा, अंगणवाडी- 3 हजार 775, प्राथमिक आरोग्य केंद्र- 68, उपकेंद्र- 379 व 1 हजार 310 ग्रामपंचायतीमधून सुमारे 9 हजार 176 वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.

     गट विकास अधिकारी यांच्यासह नियंत्रणात गट शिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, उपअभियंता, विस्‍तार अधिकारी यांच्यासह तालुकास्तरावरील खातेप्रमुखांनी त्यांच्या विभागाची जबाबदारी घेऊन वृक्ष लागवड करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत.


जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे ह्या उपक्रमशील मुख्य कार्यकारी अधिकारी असून त्यांनी अनेक नवउपक्रम जिल्‍हयात राबविले आहेत. वटपौर्णिमेनिमित्त जिल्ह्यात एकाच वेळी सुमारे नऊ हजार वृक्षांची लागवड पहिल्यांदाच केली जात आहे. या नाविन्‍यपूर्ण उपक्रमामुळे गावागावात वडाची लागवड केली जाणार आहे. आयुर्वेद शास्त्रात वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याची मूळे, पाने, फुले, फळे, साल, पारंब्या, चिक ह्या सगळ्यांचा औषधी उपयोग होतो व त्यामधून असंख्य आजारांवर उपचार करता येतो. याशिवाय वडाचे झाड एका तासाला साधारणपणे सातशेबारा किलो ह्या प्रमाणात ऑक्सिजन वातावरणात सोडते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News