*माझी पोषण परसबाग विकसन मोहीम...!* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, July 8, 2022

*माझी पोषण परसबाग विकसन मोहीम...!*



नांदेड : उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, नांदेड व संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी  यांच्या संयुक्त विद्यमाने “माझी पोषण परसबाग विकसन मोहीम” नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू झाली. 

       शुक्रवार (ता. 08) रोजी  ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली आहे. जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे  व प्रकल्प संचालक डॉ. संजय तूबाकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोषण परसबाग मोहीम विषयी प्रशिक्षण घेण्यात आले. प्रत्येक शेतकरी कुटुंबासाठी वर्षभर लागणारा विषमुक्त भाजीपाला आपल्या परसबागेत तसेच शेतातील आखाड्याजवळ लागवड करून रोज लागणारा भाजीपाला स्वतःच्या डोळ्यासमोर पिकवावा, यासाठी सदरील कार्यक्रमात डॉ. माधुरी रेवनवार यांनी आपल्या आहारातील भाजीपाल्याचे महत्व  महिलांना पटवून दिले. 


महिलांचे आजार, सध्याची बदललेली जीवनशैली, घराघरात पोहचलेले आजार जसे कर्करोग (कॅन्सर) मधुमेह, हृदयविकार इत्यादि या आजारापासून दूर राहायचे असेल तर आपल्याला विषमुक्त अन्नाशिवाय पर्याय नाही. या प्रशिक्षणात शास्त्रशुद्ध पद्धतीने कमी जागेत 38 प्रकारचा भाजीपाला पिकवण्याचे तंत्र . "पोषण परसबाग" तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. 

अशी दिसेल परसबाग


       या प्रशिक्षणाला नांदेड जिल्हातील गावस्तरावर काम करणारे ICRP, बँक सखी, सर्व प्रकारचे कॅडर्स, ग्रामसंघ व प्रभागसंघांचे सदस्य  तसेच उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन पातेवार, जिल्हा व्यवस्थापक-MIS गणेश कवडेवार,  जिल्हा व्यवस्थापक-IBCB द्वारकादास राठोड, जिल्हा व्यवस्थापक- कृतीसंगम स्वप्निल कचवे, जिल्हा व्यवस्थापक-FI, माधव भिसे, जिल्हा व्यवस्थापक-मार्केटिंग धनंजय भिसे, जिल्हा व्यवस्थापक रमेश थोरात आणि सर्व तालुका व्यवस्थापन कक्षाचे सर्व कर्मचारी आदिंसह २००० हून अधिक संख्येने महिला उपस्थित होत्या.



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News