किनवट : तालुक्यातील वझरा (बुद्रूक) येथील रहिवाशी तथा ज्येष्ठ प्रतिष्ठीत नागरिक कौशल्याबाई कचरुजी कांबळे (वय ७८ वर्षे ) यांचे शनिवार (ता. ९) रोजी सायंकाळी ५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
रविवार (ता.१०) रोजी सकाळी ठीक ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर वझरा (बु ) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कचरूजी कांबळे यांच्या त्या पत्नी, संरपच संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष जितेन्द्र कांबळे व रविंद्र काबळे यांच्या त्या मातोश्री आणि पंचायत समितीच्या माजी सदस्या रेणुकाबाई जितेन्द्र कांबळे यांच्या त्या सासू होत.




No comments:
Post a Comment