मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : बुधवारी (ता.आज 17 ऑगस्ट 2022 ) सकाळी 11 वाजता संपूर्ण देश काही क्षणासाठी थबकला! हो! त्याला कारणही तसंच होतं. ते कारण म्हणजे "स्वातंत्र्याचाअमृत महोत्सव" साऱ्या देशाने आज आपल्या आझादीचा अमृत महोत्सव खऱ्या अर्थाने साजरा केला.
भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आव्हान केलं आणि प्रत्येक राज्यांनी आज आजादी का अमृत महोत्सवाच्या अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायन कार्यक्रमात भाग घेतला. आज आपल्या देशामध्ये प्रत्येक नागरिकांनी राष्ट्रगीत गाऊन आपला सार्थ अभिमान देशाबद्दलचा आदर व्यक्त केला. मुंबईतील अंधेरी येथील हंसराज बालाजी पब्लिक स्कूल या शाळेमध्ये सुद्धा आज मोठ्या उत्साहाने समूहगान कार्यक्रम साजरा केला. विद्यार्थी व शिक्षकांनी कार्यक्रमात सहभागी होऊन राष्ट्रगीत गाईले. देशाबद्दलचा हा आदरभाव, सन्मान केवळ आझादी का अमृत महोत्सवाच्या काळातच नाही तर सतत रहावा अशी आशा सर्वांनीच व्यक्त केली.




No comments:
Post a Comment