नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्टच्या जिंकू किंवा मरू राज्यव्यापी आंदोलनाला भरघोस प्रतिसाद ;भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, September 1, 2022

नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्टच्या जिंकू किंवा मरू राज्यव्यापी आंदोलनाला भरघोस प्रतिसाद ;भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

 



यवतमाळ : वर्धा --यवतमाळ- नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाच्या उत्खननातील करोडो रुपयांच्या गौण खनिज भ्रष्टाचार प्रकरणासंदर्भात गेल्या दोन वर्षापासून नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट, महाराष्ट्र या संघटनेचे राज्य सचिव /तक्रारदार/पत्रकार अमोल कोमावार यांच्या सतत पाठपुराव्यामुळे भ्रष्टाचार उघड झाला. परंतु संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना पाठीशी घालून भ्रष्टाचाराला खतपाणी घातले. त्याचबरोबर हे प्रकरण दडपण्यासाठी तक्रारदारावर प्रचंड दडपण आणून त्याच्या जीवाशी खेळ करून, पदाचा गैरवापर करून, अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या प्रकरणाची दखल घेऊन ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र व नॅशनल युनियन ऑफ जनरल लिस्ट महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य अध्यक्ष गजानन वाघमारे तसेच अमरावती विभाग प्रमुख कुशल नेतृत्व करणारे गोपाल नारे यांच्या नेतृत्वात नुकतेच " जिंकू किंवा मरू" राज्यव्यापी आंदोलनाचे यवतमाळ येथे आयोजन केलेल होते.

         सविस्तर वृत्त असे की, वर्धा- यवतमाळ - नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाच्या उत्खननातील करोडो रुपयांच्या गौण खनिजाचा भ्रष्टाचार करून, शासनाचा महसूल बुडवून करोडो रुपयाचा गौण खनिज रेल्वे कंत्राटदार यांनी राज्य शासनाच्या काही भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करून खुल्या बाजारात विकला. या संबंधातील तक्रारी अमोल कोमावार यांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना देऊन जाय मोक्यावर गैरप्रकार होत असताना साक्षी पुराव्या सहित पकडून दिल्यानंतर सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी कुठल्याही पद्धतीची कारवाई कंत्राट दारावर तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांवर केलेली नाही. याउलट हे प्रकरण दडपण्यासाठी तक्रारदार अमोल कोमावार याच्यावर पदाचा गैरफायदा घेऊन संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांनी प्रकरण दडपण्यासाठी, कोणत्यातरी प्रकरणात गोवन्यासाठी ऑटोकाट प्रयत्न केले. त्यामुळे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी व पत्रकारांवर झालेल्या अन्यायाला न्याय देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ यांच्या जाहीर पाठिंब्याने , नॅशनल युनियन ऑफ जनरल लिस्ट यांच्या  विद्यमाने ,"जिंकू किंवा मरू" राज्यव्यपी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.  या राज्यव्यापी आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व ग्रामीण पत्रकार संघासह विविध संघटनांनी सक्रिय सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक गजानन  वाघमारे तसेच गोपाल  नारे यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात झाली. आझाद मैदान यवतमाळ पासून भव्य रॅली संपूर्ण राज्यातील हजारो पत्रकारांसह जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे फक्त प्रमुख दोन मुद्द्यासह भ्रष्टाचारांवर कारवाई व पत्रकाराला न्याय याबाबत निवेदन देऊन घेराव घातला.  दिलेल्या निवेदनानुसार मागण्याची पूर्तता करण्यासाठी अमोल येळगे,जिल्हाधिकारी यवतमाळ. यांना निवेदन सादर केले. 

         या निवेदनावर अतिशय ठामपणे व विश्वास पूर्ण जिल्हाधिकारी यांनी आपले मत मांडले तसेच तोंडी स्पष्ट विश्वास देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची व तक्रारदारासह नॅशनल युनियन ऑफ जनरल लिस्ट या संघटनेचे दोन सदस्य यांची मिळून एक जिल्हास्तरीय चौकशी समिती नेमल्या जाऊन निपक्षपणे सात दिवसाच्या आत दोषी व भ्रष्टाचार यांवर फक्त कारवाई केल्या जाईल असे ठामपणे सांगितले. जिल्हाधिकारी यांच्या विनम्र विश्वासाने दिलेल्या शब्दाने या आंदोलनाची सांगता झाली.

       या आंदोलनामध्ये बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू देशमुख तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच अकोला जिल्हा, वाशिम जिल्हा जालना औरंगाबाद चंद्रपूर अमरावती जिल्हा व तालुक्यातून अनेक कार्यकर्ते तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी सर्व पत्रकार बांधव त्याचबरोबर यवतमाळ येथील  पवार व मित्र मंडळ तसेच शंकर माहूरे,गोपाल गौरवाड,बाबाराव उबाळे, लक्ष्मण कांबळे, दिनेश खांडेकर, विजय निखाते, ज्ञानेश्वर मेटकर,नारायण शिंदे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे व प्रिंट मीडियाचे पत्रकार हजर होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News