टायर फुटून झालेल्या अपघातात डॉ. सुरेखा बरलोटा यांचा अंत : तिघे गंभीर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Tuesday, November 1, 2022

टायर फुटून झालेल्या अपघातात डॉ. सुरेखा बरलोटा यांचा अंत : तिघे गंभीर
यवतमाळ : येथील प्रख्यात मनोविकार तज्ज्ञ डॉ. पियुष बरलोटा यांच्या चारचाकी वाहनाचे टायर फुटून झालेल्या अपघातात त्यांच्या सुविज्ञ पत्नी प्रख्यात स्त्रीरोग व प्रसुती तज्ज्ञ डॉ. सुरेखा बरलोटा यांचा अंत झाला असून अन्य तिघे जन गंभीर जखमी असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. दोन वाहनातून डॉक्टर व त्यांच्या मित्रांचे कुटूंब यवतमाळकडे येत असतांना निर्मल ते हैद्राबाद मार्गावर ही दुर्घटना घडली.


           डॉ. बरलोटा व त्यांच्या मित्राचे कुटूंब यवतमाळला परत येत असतांना निर्मल ते हैद्राबाद मार्गावर टोल नाक्यानजीक निर्मलपासून 12 किमोमिटर अंतरावर त्यांच्या चारचाकी वाहनाचे टायर अचानक ब्रष्ट होऊन ते फुटले. त्यामुळे हा अपघात झाला. एमएच 29 बीपी 4200 क्रमांक असलेली ही गाडी अपघातग्रस्त झाली. अपघातानंतर लोक धावले व त्यांनी जखमींना बाहेर काढून निर्मल येथील शासकीय रुग्णालयात पोहोचविले. पुजा पियुष बरलोटा वय 16 तसेच अतिथी वय 18 आणि मिनल वय 40 असे तिघेजन निर्मल येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. बाकी इतरांना किरकोळ जखमा असल्याचे समजते. ही वार्ता यवतमाळात येताच वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. बरलोटा यांचे मित्र निर्मलकडे रवाना झाले. हैद्राबाद येथील डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले. निर्मल येथील शासकीय रुग्णालयात मृतक डॉ. सुरेखा पियुश बरलोटा यांच्या पार्थीवाचे शवविच्छेदन करण्यात आले असून रात्री उशिरा हे पार्थिक यवतमाळात पोहोचण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News