शेतमजुराच्या मुलाने नीटवर केली मात, डॉक्टर होण्यास हवी आर्थिक मदतीची साथ - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, November 3, 2022

शेतमजुराच्या मुलाने नीटवर केली मात, डॉक्टर होण्यास हवी आर्थिक मदतीची साथ

 



किनवट : तालुक्यातील रिठा गावातील प्रमोद दिलीप कांबळे या शेतमजूराच्या मुलाने जिद्दीने अभ्यास करून नीट परिक्षेत अपेक्षित गुण घेऊन एमबीबीएसला प्रवेश मिळवलाय ; परंतु त्याच्या कमकुमवत परिस्थितीमुळे त्याला होक्टर होण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.
         तालुक्यातील रिठा या छोट्याशा गावातील प्रमोद दिलीप कांबळे हा शेतमजूराचा मुलगा. घरी अत्यंत दारिद्र्य.  आई-वडीलांना इतरांच्या शेतावर जाऊन रोजमजुरी केल्याशिवाय चुल पेटत नाही. त्याने रिठा व रिठातांडा येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक, सावरगाव तांडा येथील संत भगवानबाबा विद्यालयात माध्यमिक व गोकुंदा येथील महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शिक्षण घेतलं. 
      


     मुलाने तिसरीपासून पाहिलेल्या स्वप्नासाठी आई दयासिंधू व वडील दिलीप यांनी बचत गटाचे कर्ज घेऊन मुलाची फीस भरली. मुलानेही याचं चीज करण्यासाठी जिद्दीने कठोर मेहनत करून नीटमध्ये यश मिळविले. सरपंच संदीप पानपट्टे यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्याचा सत्कार केला. नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम. बी. बी. एस. साठी त्याचा प्रवेश निश्चित झाला. परंतु त्याची हलाकिची परिस्थिती पाहता पुढील शिक्षण पूर्ण करून डॉक्टर होण्यासाठी त्याला समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.
         त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पुढील खात्यावर मदत पाठवता येईल.

नाव : प्रमोद दिलीप कांबळे
खाते क्रमांक : 80065020640
IFSC CODE: MAHG0004101
बँकेचे नाव : महाराष्ट्र ग्रामीण बैंक
शाखा: ईस्लापूर


येथे स्कॅन करून फोनपे द्वारे त्याच्या खात्यावर रक्कम जमा करता येईल.






No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News