मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवाच्या औचित्याने विभागीय आयुक्तांनी दिलेल्या सर्व उपक्रमांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी -मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, November 16, 2022

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवाच्या औचित्याने विभागीय आयुक्तांनी दिलेल्या सर्व उपक्रमांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी -मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे




 

नांदेड : मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवाच्या औचित्याने  विभागीय आयुक्तांनी दिलेल्या सर्व उपक्रमांची अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे करावी, यासाठी विशेष उपक्रम आयोजित करावेत, अशा सूचना नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा त्यांनी आज दीर्घ आढावा घेतला.

      बुधवार (ता.16) जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली समन्‍वय सभा घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास योजनेचे प्रकल्प संचालक डॉ. संतोष तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, व्‍ही.आर. पाटील, नारायण मिसाळ, रेखा काळम-कदम, कार्यकारी अभियंता नीला, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, डॉ. सविता बिरगे यांच्यासह खाते प्रमुखांची उपस्थिती होती.

        पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान नव्या स्वरूपामध्ये सुरू झाले असून सर्व गट विकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त गावांना या अभियानात सहभागी करून घ्यावे. तसेच 19 नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिनानिमित्त गाव स्तरावर वैयक्तिक तसेच सार्वजनिक शौचालय बांधकामाचा शुभारंभ, शाळा व अंगणवाडी मधील शौचालयाची स्वच्छता  मोहिम राबविण्‍याच्‍या सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिल्‍या.

         समाजाप्रती बांधिलकी जपणारे खूप लोक आहेत. शासकीय सेवा करून पेन्शन घेतलेल्या मंडळींना काहीतरी करण्याची इच्छा असते. सेवा देण्याची इच्छा असते. त्यांच्या सेवा आपण आपल्या शाळा, ग्रामपंचायत तसेच विविध आस्थापनावर घेऊ शकतो. यासाठी गाव पातळीवर प्रयत्न व्हावेत. समाजा प्रतीची कृतज्ञता म्हणून त्यांच्या सेवांचा लाभ आपणास घेता येईल त्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्‍या. मराठावाडा मुक्‍ती संग्रामाच्‍या अमृत मोहत्‍सवी वर्षानिमित्‍त माजी सैनिक व त्‍यांचे वारसदार व पेन्‍शनर्स यांच्‍यासाठी कृतज्ञता कार्यक्रमाचे आयोजन करण्‍याच्‍या सूचनाही त्यांनी दिल्‍या. मराठावाडा मुक्‍ती संग्रामाच्‍या अमृत मोहत्‍सवी वर्षानिमित्‍त वर्षभर विविध उपक्रम राबवण्‍याचे कॅलेंडर तयार करण्‍यात येणार आहे. त्‍यानुसार कायक्रम राबवावेत असेही त्‍या म्‍हणाल्‍या. प्रारंभी जिल्‍हा परिषदेच्‍या कै. यशवंतराव चव्‍हाण सभागृहाच्‍या नुतनिकरणाचे उद्घाटन मुख्‍य कार्यकारी अधिकरी वर्षा ठाकूर-घुगे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

         याप्रसंगी महाराष्ट्र जिवन्‍नोती अभियान, महिला व बाल विकास, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नरेगा, कृषी, ग्राम पंचायत, समाज कल्याण, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, स्वच्छ भारत मिशन, बांधकाम विभाग, आरोग्य, जलसंधारण विभाग आदी विभागांचा आढावा त्‍यांनी यावेळी घेतला.

मनरेगाची राज्यात उत्कृष्ट कामगिरी

मनरेगाच्या महत्त्वाच्या निर्देशांकामध्ये नांदेड जिल्ह्याची राज्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याबद्दल मनरेगाचे आयुक्त शंतनू गोयल यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना पत्र पाठवून कौतुक केले आहे. या उत्‍कृष्‍ट काम‍गिरीबद्दल नरेगाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी व्‍ही.आर. पाटील व नरेगा कक्षातील कर्मचाऱ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी बुके देऊन सत्कार केला.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News