संविधान उद्देशिका स्तंभ भोवतीचे अतिक्रमण कायमस्वरूपी हटवावे : स्वाभीमानी युवा सेनेची मागणी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, November 17, 2022

संविधान उद्देशिका स्तंभ भोवतीचे अतिक्रमण कायमस्वरूपी हटवावे : स्वाभीमानी युवा सेनेची मागणी

 

किनवट :स्वाभिमानी युवा सेना पदाधिकाऱ्यांकडून निवेदन स्विकारतांना उप विभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसिलदार एन. ए. शेख

किनवट : संविधान चौकात संविधान उद्देशिका स्तंभाची नव्याने उभारणी करावी व भोवतालचे अतिक्रमण त्वरीत कायमस्वरूपी  हटवावे , अशी मागणी स्वाभीमानी युवा सेनेच्या वतीने सहायक जिल्हाधिकारी व नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
          शहरातील छत्रपती शिवराय पुतळा परिसरात व  नगर परिषदेच्या जुन्या इमारती समोर असलेल्या पालिका अभिलेख्या वर संविधान चौक म्हणून नौद असलेल्या  संविधान उद्देशिका स्तंभाची अवस्था जीर्ण झाली असुन, भोवताली असलेले लोखंडी कंपाऊंड गंजून गेले आहे. संविधान स्तंभ परिसरात दिवसा भेलपुरी, आईस्क्रिम, कटलरी, कपड्याच्या दुकानाचे गाडे व्यापारी लावत असतात. संविधान स्तंभाच्या आजूबाजूला छोट्या मोठ्या व्यापार्‍यांनी अतिक्रमणामुळे या परिसरात घान व कचरा होत आहे.  संविधान स्तंभाच्या आजूबाजूस केलेले अतिक्रमण तात्काळ कायमस्वरुपी हटविण्यात यावे व नगर परिषदेच्या वतीने रंगरंगोटी करून सुशोभीकरण करावे अशा मागणीचे निवेदन स्वाभिमानी युवा सेना, किनवटचे तालुकाध्यक्ष सिध्दांत खोब्रागडे यांच्या नेतृत्वात किनवट नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे. नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत दुधारे यांनी निवेदन स्विकारले. 
          ता.26 नोव्हेंबर हा संविधान दिन आहे. त्या निमित्ताने या दिवशी कार्यक्रम आयोजित केले जातात. संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन घेण्यात येणार आहे. तसेच संविधान रॅलीचा समारोपही येथेच होणार आहे. येथे जमलेल्या संविधान प्रेमी नागरिकांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी तेथील अतिक्रमण कायमस्वरुपी हटविण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

किनवट :स्वाभिमानी युवा सेना पदाधिकाऱ्यांकडून निवेदन स्विकारतांना नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक तथा अधिक्षक चंद्रकांत दुधारे
     निवेदनावर स्वाभिमानी युवा सेना तालुका शाखेचे अध्यक्ष सिद्धांत खोब्रागडे,  उपाध्यक्ष शिलरत्न पाटील, सचिव विपीन पवार,  सहसचिव सुगत भरणे, कोषाध्यक्ष सुमित शेंद्रे, शहराध्यक्ष निवेदक कानिंदे, मंगेश कानिंदे, प्रथमेश रत्नमानके यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. निवेदनाच्या प्रती सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी, व पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन किनवट येथे देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News