गोकुंद्यातील बिरसा मुंडा चौक ते हबीब कॉलनी रस्ता तात्काळ दुरूस्त करा अन्यथा रस्त्यावरच प्राणांतिक उपोषण करणार -मारोती सुंकलवाड - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, November 18, 2022

गोकुंद्यातील बिरसा मुंडा चौक ते हबीब कॉलनी रस्ता तात्काळ दुरूस्त करा अन्यथा रस्त्यावरच प्राणांतिक उपोषण करणार -मारोती सुंकलवाड

 



किनवट : येथून जवळच असलेल्या गोकुंद्यातील बिरसा मुंडा चौक ते हबीब कॉलनी ह्या रस्त्यावर खड्डे पडून नळकांडी पाईप फुटून भयंकर खराब झालेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी , अन्यथा एक डिसेंबर रोजी रस्त्यावरच प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा पेटकुले नगरातील रहिवाशी , नांदेड जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) सदस्य , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारोती कानबाजी सुंकलवाड यांनी येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

         हबील कॉलनीतील प्रार्थनास्थळ रस्त्यालगतच आहे. येथील नळकांडी पूल फुटल्यामुळे कॉलनीतील सांडपाणी त्या खड्डयात गुडघाभर साचत आहे. त्यामुळे तेथे दुर्गंधीयुक्त् चिखलाची घाण रस्याांवर साचत आहे. ही गंभीर बाब आहे. रस्या्रवरून ये-जा करणाऱ्या पादचारी , रिक्षा, दुचाकी व  चारचाकी वाहनांना भयंकर अडथळा होत आहे. यामुळे प्रवाशांची हेळसांड होत आहे. शिवाय खड्डयामध्ये साचलेले घाण पाणी वाटसरूंच्या, प्रवाशांच्या अंगावर व शाळकरी विद्यार्थ्यांच्या आंगावर उडून प्रवाशांचे कपडे व विद्यार्थ्यांचे शालेय गणवेश चिखलाने माखुन खराब होत आहेत.

       या शिवाय वाहने रस्त्यावर घसरून पडून त्यातील प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. या संबंधाने मागीलएक वर्षापासुन संबंधीत विभागाकडे त्यांनी मागणी केली. परंतु याकडे जि.प.प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. नागरीकांची रस्त्यावरील प्रवासाची गैरसोय दूर करण्यासाठी तात्काळ सदर विषयी कार्यवाही करावी. अन्यथा जि.प.बांधकाम उपविभाग, किनवटच्या विरूध्द् जनकल्याणार्थ गुरुवारी (ता. 01 डिसेंबर ) हबीब कॉलनी येथे रस्त्यावरच प्राणांतीक उपोषणास बसणार असल्याचे श्री सुंकलवाड यांनी निवेदनात नमूद केले आहे. 

         यापूर्वीही त्यांनी आंदोलन केल्याने ठाकरे चौक ते बिरसामुंडा चौकापर्यंत रस्ता नालीसह होत आहे. 

         

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News