भारत जोडो यात्रेत नांदेडचा सव्वा तीन वर्षीय साथी रेषीवचा सहभाग - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, November 18, 2022

भारत जोडो यात्रेत नांदेडचा सव्वा तीन वर्षीय साथी रेषीवचा सहभाग

 



नांदेड : भारत जोडो यात्रेला जनसामान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नांदेड जिल्ह्यातून कळमनुरी, हिंगोली आणि वाशीम जिल्ह्यात प्रवेश  करेपर्यंत सहभागी झालेल्या रेषीव रूची मनीष या सव्वातीन वर्षाच्या बालकांने सर्वांचे लक्ष वेधले.

   


   राहुल गांधी हे भारत जोडत मुले, युवक, ज्येष्ठ नागरिकांचे आयकॉन राहिले आहेत. युट्युब, फेसबुक आणि इतर समाज माध्यमावर त्यांचा  प्रभाव दिसत आहे. युट्युबवर गाणी मिमिक्री पाहणाऱ्या रेषीवला भारत जोडो आणि राहुल गांधी यांच्या रिल्स पाहायला मिळत होत्या. भारत जोदो अशा बोबड्या घोषणा देणाऱ्या रेषीवला त्याच्या आजोबांनी नांदेड पासून कळमनुरी, हिंगोली ते वाशिम सीमेपर्यंत या यात्रेत सहभागी केले. दररोज तीन ते चार किलोमीटर सगळ्यांसोबत धुडू धुडू पळत चालत रेषीवने 6 दिवसात 16 किलोमीटर अंतर पार केले. उत्साहात चालणारे यात्रेकरू झेंडा घेऊन पळणाऱ्या या मुलाच्या प्रेमात पडत होते. हे मूल सर्वांच्याच औत्सुक्याचा विषय झाले होते .

   


     मुंबई येथून आलेले थ्री वे मीडियाचे संचालक सोनवणे आणि त्यांचा सहयोगी अभिजीत वाघमारे, हरियाणाच्या यात्री पिंकी सिंग, प्रिया अग्रवाल, पंकज मिश्रा, सुरेश देवतळे, डॉ.मधू डोंगरकर, डॉ.नंदलाल, साताऱ्याचे काँग्रेस सरचिटणीस इनामदार अनेक माध्यमकर्मी उपस्थित नागरिक त्याच्याशी, हस्तांदोलन करीत. त्याच्याशी बोलत किंवा त्याला उचलून घेऊन पुढे चालत.

     


   पक्ष, समूह कुठलाही कंंपू याची कुठलीही जाणीव नसणारी हे मूल लोकांच्या स्नेहार्द नजरांचे तेवढे भुकेले होते. त्याचीही स्नेहभूक यात्रेकरू त्याला अंगावर उचलून घेत सुखावत होते. माणूस म्हणून एकमेकांना जोडण्यासाठी एकमेकांसोबत चालणे, संवाद करणे यापेक्षा  उत्तम काय असणार. वाशिमच्या सीमेपर्यंत जाऊन हा छोटा यात्रेकरू नांदेडला परतला आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News